Satara News | धक्कादायक ! साताऱ्यात 20 वर्षीय तरूणाचा आढळला मृतदेह

0
1644
Satara News | a body of a 20 year old youth has been found in satara parakhandi
file photo

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन – Satara News | साताऱ्यामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये वाई तालुक्यातील परखंदीच्या शिवारात आज सकाळी एका अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी या मृतदेहाची ओळख पटवली आहे. मृत पावलेल्या 20 वर्षीय तरुणाचे नाव अभिषेक जाधव असे असून तो खानापूर येथील रहिवाशी आहे. (Satara News)

या घटनेमुळे वाई तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. प्रेम प्रकरणातून हि हत्या करण्यात आली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या घटनेमुळे खानापूरमध्ये देखील तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. आज सकाळी परखंदी गावातील काही नागरिक हे शेताकडे जात असताना त्यांना अभिषेकचा मृतदेह आढळून आला. यानंतर त्यांनी तातडीने या घटनेची माहिती वाई पोलिसांना दिली. (Satara News)

या घटनेची माहिती मिळताच वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे, पोलीस उपनिरीक्षक स्नेहल सोमदे, पोलीस उपनिरीक्षक कृष्णराव पवार, डीबी पथकाचे विजय शिर्के, श्रावण राठोड, सपोनी आशिष कांबळे,
किरण निंबाळकर, अमित गोळे, प्रसाद दुदुस्कर यांच्यासह सर्व टीम घटनास्थळी पोहोचली.
यानंतर पोलिसांनी मृतदेहाची झडती घेतली असता त्याच्याकडे असलेल्या कागदपत्रावरून त्याची ओळख पटली.
यानंतर पोलिसांनी अभिषेकचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सातारा याठिकाणी पाठवला.
शवविच्छेदनाचा अहवाल आणल्यानंतर पुढील गोष्टी स्पष्ट होतील. वाई पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

Web Title :-  Satara News | a body of a 20 year old youth has been found in satara parakhandi

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nayanthara | अभिनेत्री नयनताराने सांगितला कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव ; म्हणाली “मला मुख्य भूमिका देण्याच्या बदल्यात…”

Joginder Sharma | भारताचा वेगवान गोलंदाज जोगिंदर शर्माची क्रिकेटमधून निवृत्ती