मराठा आंदोलकांचे कृष्णा व कोयना नदीच्या प्रीतिसंगमात अर्धजलसमाधी

कराड : पोलीसनामा ऑनलाईन

सात ते आठ मराठा बांधव, भगिनींनी मराठा आंदोलकांनी प्राणाचे बलिदान दिले. यानंतरही आराक्षणाच्या प्रश्नावर प्रशासन गंभीर नाही. त्यामुळे कराड तालुक्यातील मराठा आंदोलकांनी निषेध म्हणून कृष्णा व कोयना नदीच्या प्रीतिसंगमात उतरून आर्ढजलसमाधी घेत निषेध व्यक्त केला.

याबाबत अधिक माहिती अशी की, शुक्रवारी सकाळी ११ वाजता शासनाचा निषेध नोंदवत मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजेत. चाफळ परिसरातील रोहन तोडकरच्या कुटुंबियांना न्याय मिळालाच पाहिजे अशी घोषणाबाजी करत मराठा आंदोलक नदीत उतरले. तसेच शासन चर्चेची टूम काढून मराठा समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत मराठा आंदोलकांनी अर्धजलसमाधी घेत सरकारचा निषेध व्यक्त केला आहे.

इतकेच नव्हे तर या दरम्यान सरकारने मराठा आरक्षणाबाबत घेतलेली भूमिका आणि मराठा समाजाच्या मागण्यांकडे सातत्याने केलेले दुर्लक्ष, तसेच आरक्षणाबाबत झालेली बेताल वक्तव्ये यामुळे मराठा समाज संतप्त झाले असून आंदोलनास प्रशासनच जबाबदार आहे. त्यामुळे मराठा समाजातील आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले राज्यभरातील गुन्हे मागे घेण्यात यावेत या मागणीसह अन्य मागण्यांच्या पूर्तता व्हावी, यासाठी कराड तालुका मराठा समाज आंदोलन कर्त्यांनी तीन दिवसांपूर्वी बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु झाले आहे.
[amazon_link asins=’B01F7AX9ZA’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’3c868eb5-9702-11e8-833a-1385a127cece’]
विशेष म्हणजे कराड तालुका मराठा समाज महिला आंदोलन कर्त्यांनी बुधवारपासून बेमुदत ठिय्या आंदोलनास दत्त चौकात प्रारंभ केला आहे. या आंदोलनानंतरही जिल्हाधिकारी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी यांना आंदोलनाची दखल घ्यावी वाटत नाही. त्याचबरोबर चाफळ येथील रोहन तोडकर या मराठा बांधवाचा नवी मुंबई येथील आंदोलनावेळी निर्घृण खून करण्यात आला. या घटनेला आठवडा उलटून गेला तरी अद्यापही पोलिसांना मारेकऱ्यांचा शोध घेण्यात अपयशच आले आहे. तसेच सात ते आठ मराठा बांधव, भगिनींनी मराठा समाजाच्या मागण्यांसाठी प्राणाचे बलिदान दिल्याचीही घटना घडल्या आहेत.