Satara News : पाचवड येथे तरुणाचा लाकडी दांडक्याने खुन

सातारा : पाचवड फाटा येथे दोन उत्तर भारतीयांमध्ये झालेल्या भांडणात एकाने २४ वर्षाच्या तरुणाच्या डोक्यात लाकडी दांडक्याने मारहाण करुन त्याचा खुन केला.

रवी (वय २४, रा. पाचवड फाटा) असे खुन झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडली.

रवी हा पाचवड फाटा येथे एका गॅरेजमध्ये कामाला होता. तेथे असलेल्या एकाबरोबर रवी याचे किरकोळ कारणावरुन भांडण झाले. या भांडणाचे रुपांतर मारामारीत झाले. तेव्हा हल्लेखोराने लाकडी दांडक्याने रवीच्या डोक्यात मारहाण केली. वर्मी घाव बसल्याने रवीचा जागीच मृत्यु झाला. ही घटना समजल्यानंतर तातडीने पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. पाचवड पोलीस अधिक तपास करीत आहेत.