सातारा पालिकेत ‘कोरोना’चा शिरकाव; महिला अधिकारी बाधित

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोनाने आता सातारा पालिकेत शिरकाव केल्याने सर्वांचे धाबे दणाणले ओहत. कोरोना निवारण कक्षात काम करणार्‍या एका महिला अधिकार्‍याला कोरानाची लागण झाली आहे. संबंधित अधिकार्‍याचा अहवाल गुरुवारी रात्री पॉझिटिव्ह आला होता, त्यामुळे सातारा पालिकेची इमारत सील करण्यात आली आहे. अतिसंपर्कात आलेल्या अधिकारी, कर्मचार्‍यांना क्वॉरंटाईन करण्यात आले असून, त्यांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले आहेत.

कोरोनाबाधित महिला अधिकारी ही स्थावर विभागप्रमुख असून कोरोना कक्षाचा अतिरिक्त कार्यभार त्यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. या कक्षात कोरोनासंबंधी कामकाज चालत होते, त्यामुळे या ठिकाणी नगरसेवकांसह, नागरिक, कर्मचारी आणि अधिकार्‍यांची मोठी वर्दळ असते.