Big Boss : सातारा पोलिसांकडून स्पर्धक अभिजीत बिचुकलेला ‘बिग बॉस’च्या घरातून अटक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बिग ब़ॉस मराठी २ मधील सर्वाधिक चर्चेत असलेला स्पर्धक अभिजीत बिचुकलेला सातारा पोलिसांनी बिग बॉसच्या घरातून अटक केली. साताऱ्यातील एका जुन्या चेक बाऊन्सप्रकरणी अभिजीत बिचुकले याच्यावर कारवाई केली.

अभिजीत बिचुकले विरोधात सातारा न्यायालायने चेक बाऊन्स प्रकरणी वारंट जारी केले आहे. त्याची अंमलबजावणी कऱण्यासाठी पोलीस बिग बॉस मराठी सीझन २ च्या सेटवर दाखल झाले. त्यांनी मुंबईतील गोरेगाव येथील फिल्मसीटीतील बिग बॉस मराठीच्या सेटवरून मुंबई पोलिसांच्या मदतीने अटक केली.

Image result for Abhijit bichukle big boss hd

बिचुकले यांना उद्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. तर बिचुकले याचा बिग बॉसमधील प्रवास येथेच थांबणार का याची उत्सुकता लागली आहे.

अभिजीत बिचुकले बिग बॉसच्या घरात आल्यापासूनच वादात आहेत. त्यांनी घरातील सहस्पर्धक आणि अभिनेत्री रुपाली भोसलेला शिवीगाळ केली होती. त्यानंतर त्यांची घरातून हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती.

Image result for Abhijit bichukle big boss hd

सिने जगत –

 

…म्हणून सानिया मिर्झा, वीना मलिक यांच्यात ट्विटरवर ‘जुंपली’, पुढे झालं ‘असं’

‘कलंक’मुळे माझ्या करिअरला ‘कलंक’ : वरूण धवन

अभिनेत्री उशोशी सेनगुप्‍ता म्हणाली, गप्प बसली असते तर झाली नसती ‘छेडछाड’ ; ७ गुंडाना अटक

‘माता-पिता की चरणों में स्वर्ग’ म्हणणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीचा ‘वाढीव’ लुक पाहिलात का ?

Loading...
You might also like