सातारा ‘S कॉर्नर’ला भीषण अपघात, पोलीस कर्मचारी शेलार गंभीर जखमी

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे-कोल्हापूर महामार्गावर भरधाव जाणाऱ्या वाहनचालकांना आपल्या वाहनांवर नियंत्रण ठेवता न आल्याने विचित्र अपघातात ४ वाहने एकमेकांवर धडकली. त्यात रस्त्यावरील एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. ही घटना रविवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास सातारा येथील एस कॉर्नर परिसरात घडली. bसुनील शेलार असे जखमी झालेल्या जिल्हा वाहतूक शाखेतील पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

पुणे-कोल्हापूर महामार्गावर साडेसात वाजण्याच्या सुमारास एक कंटेनर उलटला होता. हा कंटेनर बाजूला करण्याचे काम सुरु होते. त्याचवेळी भरधाव वेगाने वाहने येत होती. त्यात एका कार चालकाचा ताबा सुटला व त्याने कंटेनर जवळ असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला जोरदार धडक दिली. कार अचानक थांबल्याने तिच्या पाठोपाठ आलेल्या ट्रकचालकाला आपल्या ट्रकवर नियंत्रण ठेवता आले नाही व ट्रकने कारला जोरदार धडक दिली. त्यापाठोपाठ आणखी एक कार येत होती. तिनेही पाठीमागून ट्रकला धडक दिली. तर या कारच्या मागोमाग येत असलेल्या दुसऱ्या ट्रकचालकाने पुढे झालेला हा अपघात पाहून ट्रक थांबविण्याचा आटोकाट प्रयत्न केला तरीही ट्रक पुढील कारला जाऊन धडकला.

या विचित्र अपघातात पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले आहेत. चार वाहने एकमेकांना धडकली असली तरी सुदैवाने त्यात कोणीही गंभीर जखमी झाले नाही. मात्र, या अपघातामुळे महामार्गावरील एका बाजूची वाहतूक जवळपास एक तास ठप्प झाली होती. कंटेनर बाजूला करण्यासाठी आणलेल्या क्रेनने ही वाहने बाजूला करण्याचे काम पोलिसांनी सुरु केले आहे.

Visit : Policenama.com 

शिंक कधीच दाबून ठेऊ नका, शरीरावर होऊ शकतात ‘हे’ गंभीर परिणाम
अभिनेत्री मलाइका अरोडा म्हणते, ‘खास डाएटपेक्षा नेहमी पौष्टिक आहार घ्यावा’
प्रेशर कुकर वापरताना ‘हे’ १० नियम आवश्य पाळा…आणि सुरक्षित रहा
मानसिक, शारिरीक आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर ‘हे’ जरूर वाचा
उर्जा आणि उत्साह दिवसभर टिकवण्यासाठी ‘हे’ आवश्य करा, जाणून घ्या
संक्रमणापासून बचावासाठी करा; या विटॅमिनचा वापर, जाणून घ्या –
चांगल्या आरोग्यासाठी शरीराला दररोज किती कॅलरीजची असते आवश्यकता –
वजन कमी करण्याचा ‘हा’ आहे खास ‘जपानी फार्मुला’! जाणून घ्या