सातारा शहरात डंपर चालवत राजेंनी मारला फेरफटका

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन

खासदार उदयनराजे हे नेहमीच आपल्या स्टाईलमुळे चर्चेचा विषय होत असतात. सातारकरांसाठीच नव्हे तर राज्यभरात उदयनराजेंबद्दल अतिशय उत्कंठेने चर्चा केली जाते तसेच त्यांचे किस्से ऐकले जातात व सांगितले जातात.आता पुन्हा एकदा खासदार उदयनराजे चर्चेत आले आहेत. शनिवारी उदयनराजेंनी चक्क सातारा नगरपालिकेचा डंपर चालवत शहरात फेरफटका मारला. राजे डंपर चालवतात हे पाहण्यासाठी नागरिकांनी आणि त्यांच्या चाहत्यांनी गर्दी केली होती. अनेकांनी हे दृष्य आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात टिपून घेतले.
[amazon_link asins=’B07G556924′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’fff728e5-a883-11e8-a54e-7330c95c263a’]
खासदार उदयनराजे यांची यांची एंट्री नेहमीच हटके आणि जबदरस्त असते. याचा प्रत्यय सातारकरांना शनिवारी आला. सातारा नगरपालिकेच्या वतीने नव्याने खरेदी करण्यात आलेल्या वाहनांचे पूजन शनिवारी सर्व नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी वर्ग व सातारकर नागरिक यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. नवीन डंपरची पूजा आटोपल्यानंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी चक्क डंपरचे स्टेअरिंग हातात घेतले. आणि पालिकेच्या वाहतूक विभागापासून राजवाडा चौपाटीपर्यंत डंपर चालवला. त्यांच्या या कृतीने सगळेच अवाक झाले. त्यांच्या चाहत्यांसह नागरिकांनी राजेंचा हा आगळावेगळा डंपर फेरफटका कॅमेऱ्यात कैद केला.

उदयनराजे यांना वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या चालविण्याची आवड आहे. महागड्या, अलिशान गाड्या चालवताना त्यांना आजपर्यंत सर्वांनीच पाहिले आहे मात्र, शनिवारी त्यांना चक्क डंपर चालवताना पाहातानाचा योग सातारकरांना आला. त्यांचे हे फोटो सोशल मीडियावरही व्हायरल झाले होते.