IPS तेजस्वी सातपुते साताराच्या नव्या पोलीस अधीक्षक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्य गृह विभागाने राज्यातील १० IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. पुण्यातील तेजस्वी सातपुते यांची सातारा येथे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

इतर बदली झालेल्या अधिकाऱ्याचे नाव आणि त्या पुढील कंसात कोठून कोठे बदली झाली आहे ते पुढील प्रमाणे. पी. व्ही. उगले (SP, ACB, नाशिक ते पोलीस अधीक्षक जळगांव), विनिता साहू (पोलीस अधीक्षक, भंडारा ते पोलीस अधीक्षक, गोंदिया), हरिष बैजल (पोलीस अधीक्षक, गोंदिया ते समदेशक, SRPF, गट क्रमांक ६, धुळे), अरविंद साळवे (पोलीस अधीक्षक, सुरक्षा, महावितरण, मुंबई ते पोलीस अधीक्षक, भंडारा), जयंत मीना (अप्पर पोलीस अधीक्षक, अमरावती ग्रामीण ते अप्पर पोलीस अधीक्षक, बारामती, पुणे ग्रामीण), पंकज देशमुख (पोलीस अधीक्षक, सातारा ते, पोलीस उपायुक्त, पुणे शहर), तेजस्वी सातपुते (पोलीस उपायुक्त, पुणे शहर ते पोलीस अधीक्षक, सातारा), दत्ता शिंदे (पोलीस अधीक्षक, जळगांव ते (पोलीस अधीक्षक, सुरक्षा, महावितरण, मुंबई), इशू सिंधू (निवासी उपायुक्त, महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली ते पोलीस पोलीस अधीक्षक, अहमदनगर) आणि रंजनकुमार शर्मा (पोलीस अधीक्षक, अहमदनगर ते पोलीस अधीक्षक, CID, नागपूर). तेजस्वी सातपुते यांनी यापूर्वी पुणे ग्रामीण पोलीस दलात अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून देखील काम पाहिले होते. सध्या त्या पुण्याच्या वाहतूक शाखेत उपायुक्त म्हणून कार्यरत होत्या.

महत्वाच्या बातम्या –

राज्यातील १० आईपीएस (IPS) अधिकाऱ्यांच्या बदल्या 

इशू सिंधू नगरचे नवीन एस.पी., शर्मा यांची नागपूर सीआयडीला बदली 

विश्‍वास नांगरे-पाटील यांच्यासह ६ विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या (IG) बदल्या 

राज्यातील ७ अप्पर पोलीस अधीक्षक/उपायुक्तांच्या बदल्या 

राज्यातील ४ पोलीस उपमहानिरीक्षकांच्या (DIG) बदल्या