सतेज पाटील कोल्हापूरचे तर डॉ. विश्वजीत कदम ‘या’ जिल्ह्याचे पालकमंत्री

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – काही दिवसांपुर्वी ठाकरे सरकारमधील मंत्र्यांना राज्यातील जिल्ह्यांचे पालकत्व बहाल करण्यात आले होते. मात्र, कोल्हापूरच्या पालकमंत्री पदावरून काहीसा वाद निर्माण झाला होता. त्यावेळी कोल्हापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी काँग्रेसचे दिग्गज बाळासाहेब थोरात यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, आता त्यामध्ये बदल करण्यात आला आहे.

कोल्हापूरचे पालकमंत्री म्हणून सतेश उर्फ बंटी डी. पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर काँग्रेसचे राज्यमंत्री डॉ. विश्वजीत पतंगराव कदम यांची भंडारा जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दि. 8 जानेवारी रोजी करण्यात आलेल्या निर्णयामध्ये अंशतः बदल करण्यात आला असल्याचे सांगण्यात आला आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

You might also like