Satej Patil Net Worth | कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे तब्बल ‘इतक्या’ कोटींची मालमत्ता; 16 कोटी 53 लाखांचे कर्ज

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे रोख रक्कम, ठेवी,शेअर्स, गुंतवणूक आदींसह घर, जमीन, सोने इत्यादी 32 कोटी 75 लाख 49 हजार रुपयांची मालमत्ता (Satej Patil Net Worth ) आहे. याशिवाय पत्नी, मुलगी आणि कुटुंबाची एकूण मालमत्ता 40 कोटी 91 लाख 94 हजार रुपये आहे. तर बँक आणि सेवा सोसायट्यांचे मिळून एकूण 16 कोटी 53 लाख 82 हजारांचे कर्ज (loan) आहे. विधान परिषदेसाठी (Legislative Council) दाखल केलेल्या उमेदवारी अर्जासमवेत सतेज पाटील (Satej Patil Net Worth) यांनी सादर केलेल्या मालमत्तेबाबतच्या प्रतिज्ञापत्रात (affidavit) ही माहिती देण्यात आली आहे.

सतेज पाटील (Satej Patil) यांनी कसबा बावडा, ताराराणी चौक, गारगोटी, मुंबई, उजळाईवाडी, पन्हाळा इत्यादी ठिकाणची मिळतक तसेच तळसंदे, सैतवडे, साखरी, बावेली इत्यादी ठिकाणी सुमारे 16 कोटी 47 लाख 37 हजार रुपयांची मालमत्ता (Satej Patil Net Worth) आहे. तसेच 14 लाख 83 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने (Gold jewelry) आहेत. विविध बँकांतील ठेवी, शेअर्स, विमा, पोस्ट अशा ठिकाणी केलेली गुंतवणूक, रोख रक्कम आदी 16 कोटी 28 लाख 11 हजार रुपये आहेत.

न्यायालयीन स्थगिती असलेले वादग्रस्त 2 कोटी 66 लाख 32 हजारांचे दायित्व असल्याचे सतेज पाटील यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. कुटुंबातील सदस्यांसह अन्य मित्रमंडळीकडून विनातारणी कर्ज घेतल्याचे तसेच उसनी रक्कम दिल्याचाही उल्लेख त्यांनी प्रतिज्ञापत्रात केला आहे. पाटील यांच्या नावावर टाटा सफारी (Tata Safari) हे एकच चारचाकी वाहन आहे. तर कुटुंबातील इतर दोन सदस्यांच्या नावे कोणतेही वाहन नाही.

Web Title : Satej Patil Net Worth | Kolhapur guardian minister satej patil has assets worth rs 32 75 crore and Debt of 16 crore 53 lakhs

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Farm Laws | शेतकरी आंदोलनाचा मोठा विजय ! वर्षभरापासून सुरू होतं आंदोलन; 600 शेतकर्‍यांचा बळी का घेतला?, विरोधकांचा पीएम मोदींवर हल्ला

Farm Laws | PM नरेंद्र मोदींचा मोठा निर्णय ! 3 कृषी कायदे केंद्राकडून रद्द; देशवासियांची माफी मागून 7 वर्षाच्या काळात प्रथमच घेतले पाऊल मागे (व्हिडीओ)

Pune Crime | काय सांगता ! होय, चक्क पुणे महापालिकेला 1 कोटी रुपयांचा गंडा घालण्याचा प्रयत्न; गुन्हा दाखल, जाणून घ्या प्रकरण

Balasaheb Thorat | ‘पोटनिवडणूक बिनविरोध करावी याबाबत फडणवीसांसोबत चर्चा’ – थोरात

Maharashtra Gram Panchayat by-election | महाराष्ट्रातील 7 हजार ग्रामपंचायत सदस्यांच्या पोटनिवडणुकांसाठी तारखा जारी

Kanyaka Bank Chandrapur Recruitment 2021 | श्री कन्यका नागरी सहकारी बँकेत विविध पदांसाठी भरती, जाणून घ्या

NCP MLA Babajani Durrani | राष्ट्रवादीचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांना गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी; प्रचंड खळबळ