धक्कादायक ! ‘जैश’चा मदरसा उध्वस्त झालाच नाही ; सॅटेलाईट फोटो समोर

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था – एअर स्ट्राईक विषयी धक्कादायक माहिती समोर आली आहे. ज्या ठिकाणी एअर स्ट्राईक करण्यात आला होता, त्याठिकाणची जैश-ए-मोहम्मदच्या मदरशाची इमारत जशीच्या तशी दिसत आहे. यासंदर्भातील नवीन सॅटेलाईट फोटो समोर आले आहेत. रॉयटर्सने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.

२६ फेब्रुवारीला भारतीय वायुदलाने पाकिस्तानविरोधात केलेल्या एअर स्ट्राईक कारवाईमध्ये  बालाकोटमधील जैश-ए-मोहम्मदची तळ उध्वस्त  केल्याचा दावा केला. रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, बालाकोटमधील जैश-ए-मोहम्मदच्या मदरशांचे कोणत्याही प्रकार नुकसान झालेले नाही. हे सॅटेलाईट फोटोंमध्ये स्पष्ट दिसत आहे. शिवाय, मदरशांच्या इमारतींशेजारी झाडेझुडपे देखील दिसत आहेत.

भारतीय वायुदलाने एअर स्ट्राईक केल्याच्या सहा दिवसांनंतर हे फोटो जारी करण्यात आले आहे. सॅन फ्रान्सिस्कोमधील एका खासगी सॅटलाइटद्वारे हा फोटो ४ मार्चला घेण्यात आला आहे. प्लॅनेट लॅब्सतर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या फोटोंमध्ये बालाकोट परिसर स्पष्ट दिसत आहे. या फोटोंमध्ये जैश-ए-मोहम्मदचे सहा मदरसे आजही बालकोटमध्ये असल्याचे स्पष्ट दिसत आहेत.

पुलवामा दहशतवादी हल्ल्याला भारतानं एअर स्ट्राइक करून प्रत्युत्तर दिलं आहे. वायुसेनेने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून २६ फेब्रुवारीला पहाटे ३. २०  वाजण्याच्या सुमारास जैश-ए-मोहम्मदच्या  दहशतवादी संघटनेच्या तळावर १००० हजार किलोचा बॉम्बचा हल्ला करत उद्ध्वस्त केला.  सुमारे ३५० दहशतवादी या हल्ल्यात मारले गेले असा दावा भारताने केला आहे. हल्ला झाल्यानंतर पाकिस्तानने  भारतीय हवाई दलाने निर्जनस्थळी बॉम्ब टाकून पळ काढल्याचा दावा केला होता.  एका ऑडिओ टेपमध्ये मसूद अझहरने भारताने बालाकोटमधील आपल्या तळावर हल्ले केल्याचे मान्य केले आहे.  आता या कारवाईबद्दल पुराव्यांची मागणी होत आहे.

पोलीस महासंचालकांना दरोडेखोरांनी दिली गोळीबार करून ‘सलामी’