Sathish Kaushik | सतीश कौशिक यांच्या शेवटच्या क्षणांत नेमकं काय घडलं? मॅनेजरने केला ‘हा’ खुलासा

पोलीसनामा ऑनलाइन : Sathish Kaushik | बॉलीवूड मधील प्रसिद्ध ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक आणि अभिनेते सतीश कौशिक यांचे दिल्लीत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वयाच्या 66 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना दिल्लीतील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.त्यानंतर सतीश कौशिक यांच्या मृत्यूपूर्वी नेमके काय झाले याबाबतची माहिती त्यांच्या मॅनेजरने दिली आहे. (Sathish Kaushik)

सतीश कौशिक यांच्या मृत्यूनंतर त्यांचे मॅनेजर संतोष रॉय यांनी एका मुलाखतीत सतीश कौशिक यांच्या शेवटच्या क्षणात नेमके काय घडले याबाबत खुलासा केला. यावेळी ते म्हणाले, “सतीश सर रात्री सुमारे 9.40 च्या आसपास झोपण्यासाठी आपल्या रूममध्ये गेले. रात्री 10 वाजता अचानकच त्यांचा मला फोन आला त्यांना अस्वस्थ वाटत होते. यावेळी ताबडतोब मी त्यांच्या रूममध्ये गेलो तेव्हा त्यांना श्वास घेण्यासाठी त्रास होत होता. मी पूर्ण वेळ त्यांच्यासोबत होतो, पण असे ते आम्हाला सोडून जातील हे वाटले नव्हते”. (Sathish Kaushik)

सतीश कौशिक यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या शवविच्छेदनाच्या अहवालामध्ये देखील हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे नमूद केले होते. याचबरोबर त्यांच्या मृतदेहावरही कोणत्याच खुणा आढळून आल्या नव्हत्या. मुंबई येथे सतीश कौशिक यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली आहे. मुंबईतील वर्सोवा येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांचे पार्थिव दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. वर्सोवा येथेच हिंदू स्मशानभूमी मध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती कुटुंबीयांकडून देण्यात आले आहे. सतीश कौशिक यांच्या माघारी त्यांची पत्नी व 11 वर्षांची मुलगी असा परिवार आहे.

Web Title :  Sathish Kaushik | satish kaushik passed away his manager revealed what happend in last few minutes

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Jalna ACB Trap | 30 हजार रुपयांची लाच स्वीकारताना महिला तलाठी, कोतवाल अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

MP Supriya Sule | पीएमपी बसचा बावधन येथील पेबल्स सोसायटीचा थांबा पूर्ववत सुरू करा – खा. सुळे

CM Eknath Shinde On Maharashtra Budget 2023 | प्रगतीवर आलेले मळभ दूर करणारा, विकासाचे चक्र गतिमान करणारा अर्थसंकल्प ! गोरगरीब, शेतकरी, महिलांना न्याय – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे