Satish Kaushik Passes Away | प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते-दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे निधन

पोलीसनामा ऑनलाईन : मनोरंजन विश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. बॉलिवूड अभिनेते-दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे निधन झाले आहे. ते 67 वर्षांचे होते. बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर यांनी ट्विट करून त्यांच्या निधनाची बातमी दिली आहे. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांचे निधन झाले आहे.

मला माहित आहे ‘मृत्यू हे या जगाचं शेवटचं सत्य आहे!’ पण मी माझा जिवलग मित्र सतीश कौशिकबद्दल असं लिहीन असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. 45 वर्षांच्या मैत्रीला असा अचानक पूर्णविराम! ओम शांती! असे अनुपम खेर यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे. या ट्विटसोबतच त्यांनी सतीश कौशिक यांच्यासोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे.

सतीश कौशिक यांच्याविषयी
सतीश चंद्र कौशिक यांचा जन्म 13 एप्रिल 1956 रोजी हरियाणामध्ये झाला. सतीश कौशिक हे प्रसिद्ध अभिनेते आणि चित्रपट दिग्दर्शक होते. त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी अनेक नाटकांमध्ये काम केले आहे. सतीश कौशिक यांनी 1983 मध्ये ‘जाने भी दो यारो’ या चित्रपटाद्वारे चित्रपट सृष्टीत पदार्पण केले होते. सतीश कौशिक यांनी मिस्टर इंडिया, दीवाना मस्ताना, साजन चले ससुराल यासह अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी मिस्टर इंडियामध्ये साकारलेली कॅलेंडरची भूमिका विशेष गाजली होती. याबरोबर त्यांनी रूप की रानी चोरों का राजा, प्रेम, हम आपके दिल में रहते है आणि तेरे नाम या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. याबरोबर त्यांना दोनदा सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता.

Web Title : Satish Kaushik Passes Away | actor and director satish kaushik passes away at 67

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Aurangabad ACB Trap | 50 हजार रुपये लाच घेताना भविष्य निर्वाह कार्यालयातील वेतन अधीक्षक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Dhule ACB Trap | 2 लाखांची लाच घेताना वीज वितरण कंपनीचे दोन बडे अधिकारी अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Pune News | सह दुय्यम निबंधक हनुमंत चव्हाण यांच्यावर कठोर कारवाई करा, प्रदेश युवक सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांची मागणी

Navin Marathi Shala | शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षातील महिलादिन नवीन मराठी शाळेत उत्साहात साजरा