Satish Kaushik | सतीश कौशिक यांच्या खुनाचा दावा करणाऱ्या महिलेचा स्वतःच्या पतीवर बलात्काराचा आरोप

पोलीसनामा ऑनलाइन : काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ अभिनेते व दिग्दर्शक सतीश कौशिक (Satish Kaushik) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. अनेक स्तरावरून त्यांच्यावर श्रद्धांजली वाहिली जात होती. त्यातच आता एका महिलेने सतीश यांच्या निधनानंतर त्यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप केला आहे. महिलेच्या या आरोपाने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. निधनापूर्वी सतीश कौशिक (Satish Kaushik) यांनी दिल्लीतील व्यावसायिक विकास मालू यांच्या फार्म हाऊसवर होळीची पार्टी केली आणि त्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. सतीश कौशिक यांच्या निधनाच्या दोन दिवसानंतर व्यवसायिकाची पत्नी सान्वी मालूने पतीवर सतीश कौशिक यांच्या हत्येचे आरोप केले आहे.

याआधी सान्वीने पती विकास वर बलात्काराचा आरोप केला होता. यावेळी ती म्हणाली होती की, “आधीही मी विकास मालू विरोधात तक्रार दिली आहे. विकासने लग्ना आधी माझ्यावर बलात्कार केला आणि जबरदस्तीने माझ्यासोबत लग्न केले. लग्नानंतर त्याचा मुलगा देखील माझ्यावर बलात्कार करायचा. काही दिवसांनी हे सर्व काही मला असह्य झाले त्यामुळे मी ऑक्टोबर 2022 मध्ये त्यांचं घर सोडले.

दरम्यान सान्वी विरुद्ध विकास मालू आणि त्याच्या पहिल्या पत्नीचा अल्पवयीन मुलगा दोघांनीही पोलिसात तक्रार दाखल केली होती. सान्वीवर पॉस्को अंतर्गत गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. सान्वी आणि विकास यांच्या एकमेकांवरील तक्रारी पोलिसांनी नोंदवल्या होत्या. मात्र अद्याप तरी कोणतीही कारवाई या दोघांवर करण्यात आलेली नव्हती.

अभिनेता सतीश कौशिक (Satish Kaushik) यांच्या निधनानंतर सान्वीने सतीश यांना आपल्या
पतीनेच मारल्याचा दावा केला. यावेळी ती म्हणाली “सतीश कौशिक यांच्याकडून माझ्या पतीने विकासने
15 कोटी रुपये घेतले होते आणि कोरोना काळामध्ये पैशांचे नुकसान झाल्यामुळे सतीश यांना 15 कोटी
परत करण्याचा कोणताच उद्देश विकासचा नव्हता. त्यामुळे त्यांनी सतीश यांची हत्या करण्यासाठी ब्लू पिल्स
व रशियन मुलींचा वापर करणार असल्याचेही त्यांनी मला सांगितले होते” असा दावा सान्वीने केला आहे.

Web Title :- Satish Kaushik | satish kaushik friend vikas malu and his son raped claims saanvi malu

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune GST Department | खळबळजनक ! भंगार व्यावसायिकाने घातला घोळ, तब्बल साडेबारा कोटींचा जीएसटी बुडविला

Summer Weight Loss Tips | केवळ कडक उन्हापासूनच वाचवणार नाही, तर पोटाची चरबी आणि एक्स्ट्रा बॉडी फॅटसुद्धा कमी करतील ‘या’ 2 गोष्टी

Kolhapur Crime News | बाप होऊ शकलो नाही ! तरुण डाॅक्टरची आत्महत्या; कोल्हापूरमधील घटना