Satish Kaushik | ‘एमर्जन्सी’ ठरला सतीश कौशिक यांचा शेवटचा चित्रपट; चित्रपटात त्यांनी ‘या’ राजकीय नेत्याची साकारली भूमिका

पोलीसनामा ऑनलाइन : ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक आणि अभिनेते सतीश कौशिक (Satish Kaushik) यांचे दिल्लीत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. वयाच्या 67 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आजवर सतीश कौशिक (Satish Kaushik) यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. सतीश कौशिक यांचा ‘एमर्जन्सी’ हा शेवटचा चित्रपट ठरला आहे.

कंगना रणौतचा एमर्जन्सी हा सतीश कौशिक यांचा शेवटचा चित्रपट ठरला. या चित्रपटात जगजीवन राम यांची भूमिका सतीश कौशिक यांनी साकारली आहे. या चित्रपटातील सतीश कौशिक यांचा फर्स्ट लूक कंगनाने शेअर करत त्यांच्या भूमिकेबद्दल माहिती दिली होती. सतीश कौशिक यांनी 1983 मध्ये जाने भी दो यारो’ या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. त्यांनी अनेक नाटकांमध्ये काम केले होते. या व्यतिरिक्त सचिन कौशिक यांनी ‘रूप की रानी’ चोरों का राजा, ‘प्रेम’, ‘हम आपके दिल में रहते है’ आणि ‘तेरे नाम’ या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. ‘मिस्टर इंडिया’, ‘दीवाना मस्ताना’, ‘साजन चले ससुराल’ या चित्रपटात त्यांनी साकारलेली भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात आहे.

सतीश कौशिक यांनी आजवर त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने वेळोवेळी जिंकली आहेत. 1996 मध्ये कौशिक यांच्या दोन वर्षाच्या मुलाचे निधन झाल्याने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. मात्र यातून ते सावरत पुन्हा जोमाने कामाला लागले. यानंतर वयाच्या 56 व्या वर्षी सरोगसीच्या मदतीने ते पुन्हा वडील झाले. सतीश कौशिक यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि 11 वर्षाची मुलगी वंशिका असा परिवार आहे.

Web Title : Satish Kaushik | satish kaushik passed away kangana ranaut emergency actor last film played politician jagjivan ram role

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Satish Kaushik Passes Away | प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते-दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे निधन

Aurangabad ACB Trap | 50 हजार रुपये लाच घेताना भविष्य निर्वाह कार्यालयातील वेतन अधीक्षक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात