पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Satish Wagh Murder Case | विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर (Yogesh Tilekar) यांचे मामा सतीश वाघ यांचा खून वैयक्तिक कारणावरुन झाला असून त्यासाठी ५ लाखांची सुपारी देण्यात आली असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Amitesh Kumar IPS) यांनी सांगितले. (Supari Murder In Pune)
पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी सांगितले की, सतीश वाघ यांच्या शेजारी राहणार्याने वैयक्तिक वादातून सुपारी देऊन हे कृत्य केले आहे. याप्रकरणी ५ पैकी ३ आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्या अटकेची प्रक्रिया सुरु आहे. ज्याने सतीश वाघ यांच्या खुनाची सुपारी दिली, त्यालाही ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल.
अमितेशकुमार यांनी पुढे सांगितले की, या गुन्ह्यात १२० ब (गुन्हेगारी कट करणे) हे कलम वाढविण्यात आले आहे. अपहरणाची घटना समजल्यानंतर गुन्हे शाखा व स्थानिक परिमंडळातील सर्व पोलीस अधिकारी, अंमलदार यांनी तपास तातडीने हाती घेतला. ४५० सीसीटीव्ही फुटेज तपासून ज्या गाडीतून अपहरण करण्यात आले होते़ तिचा शोध घेण्यात आला. त्यातून काल दोघांना गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे.
गुन्हा गुन्हे शाखेकडे हस्तांतरीत हा गुन्हा गुन्हे शाखेकडे (Pune Crime Branch) हस्तांतरीत करण्यात आला आहे. ५ लाख रुपयांची सुपारी देऊन हा खून करण्यात आला आहे. काही विरोधक पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत होते. परंतु, हा गुन्हा वैयक्तिक वादातून घडला आहे. पुणे पोलिसांनी अत्यंत कार्यक्षमतेने, मेहनत घेऊन गुन्हा उघडकीस आणला आहे. पुणे पोलीस हे कायदा सुव्यवस्था राबविण्यात नेहमीच सुसज्ज आहेत. आरोपींना शिक्षा होण्याच्या दृष्टीने भक्कम पुरावे गोळा केले जातील. पुणेकरांनी पोलिसांवर विश्वास ठेवून साथ द्यावी, असे आवाहन पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी केले आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा
https://www.instagram.com/policenamaa/?hl=en#