चंद्रकांत खैरेंचा सत्तारांच्या बाबतीतील ‘तो’ दावा मातोश्रीवरील भेटीमुळे ठरला ‘फुसका’ बार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या आठवड्यात झालेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर काल (शनिवारी) औरंगाबादमध्ये वेगळेच सत्तानाट्य रंगताना दिसले. मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सिल्लोड मतदारसंघाचे शिवसेना आमदार अब्दुल सत्तार हे पक्षावर नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलं होत. याच पार्श्वभूमीवर आज राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली. सत्तार यांची नाराजी, पक्षांतर्गत वाद, गटबाजी यांसारख्या विषयांवर झालेली ही भेट तब्बल २० मिनिटे चालली. मात्र ‘मातोश्री’वरील अब्दुल सत्तार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीमुळे खासदार चंद्रकांत खैरे यांचा दावा खोटा ठरला.

‘मुंबईचे शिवसैनिक सत्तारांना ‘मातोश्री’वर येऊ देणार नाही, असा दावा चंद्रकांत खैरे यांनी केला होता. मात्र, मुख्यमंत्री आणि सत्तारांच्या या भेटीमुळे त्यांनी केलेला दावा सपशेल फेल गेला आहे.

‘सत्तार यांनी शिवसेना संघटनेशी गद्दारी केली आहे. मातोश्रीसारख्या पवित्र ठिकाणी हिरव्या सापाला येऊ देणार नाही, त्यांनी खरा रंग दाखवला. एवढं नव्हे तर अब्दुल सत्तार यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे करणार असल्याचं खैरे बोलले होते. तसेच, मुंबईचे शिवसैनिक सत्तारांना ‘मातोश्री’ची पायरी चढू देणार नाही, असा दावा खैरे यांनी केला होता.

मात्र, झाले काही उलटेच स्वतः उद्धव ठाकरे यांनी सत्तार यांना आज मातोश्रीवर उपस्थित राहण्याचे आदेश दिले. त्यांनतर सत्तार यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यामुळे खैरे यांच्या मागणीला मुख्यमंत्र्यांनी महत्व दिले नसल्याचे दिसून आले आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/