उन्हाळ्यात आवश्य प्या सत्तूचे सरबत, डिहायड्रेशन कंट्रोल करण्यासह ताबडतोब बूस्ट करतो एनर्जी

उन्हाळ्यासाठी आज आपण एक असे देशी ड्रिंक जाणून घेणार आहोत जे मोठ्या कालावधीपर्यंत तुम्हाला एनर्जी देत राहील. सोबतच याच्या सेवनाने उन्हाळ्यात अनेक आरोग्यदायी फायदे होतील. हे ड्रिंक कोणते आणि त्याचे लाभ जाणून घेवूयात. उन्हाळ्यात डाएटमध्ये सत्तूच्या सरबतचा आवश्य समावेश करावा. सत्तू म्हणजे भट्टीत भाजलेल्या चन्याचे पीठ होय.

सत्तू सरबतसाठी साहित्य
* एक चतुर्थांश कप चना सत्तू
* एक ग्लास थंड पाणी
* लिंबूचा रस
* 4-5 फ्रेश पुदीन्याची पाने
* जीरा पावडर
* चाट मसाला
* चवीनुसार सैंधव मीठ

कृती –
सर्वप्रथम लिंबू रस, एक चतुर्थांश चना सत्तू, एक चतुर्थांश जलजीरा पावडर, एक चथुर्तांश चाट मसाला, चिमुटभर जीरा पावडर आणि चवीनुसार मीठ घ्या. हे एका ग्लासात पाणी टाकून चांगले मिसळून घ्या. आता यावर 4-5 फ्रेश पुदीना पाने टाका. तुमचा सत्तूचा सरबत तयार आहे.

हे आहेत फायदे
1 पचनशक्ती वाढते
2 उन्हाळ्यात एनर्जी लेव्हल बुस्ट होते
3 लठ्ठपणा दूर होतोश
4 शरीर थंड ठेवते
5 डिहायड्रेशन नियंत्रित करते