महाराष्ट्र प्रदेश युवक काॅंग्रेसच्या अध्यक्ष पदी सत्यजित तांबे 

नागपूर: पोलीसनामा आॅनलाइन
महाराष्ट्र प्रदेश युवक काॅंग्रेसच्या प्रदेश कार्यकारणीचे निकाल जाहीर झाले आहेत. सत्यजित तांबे यांची युवक काॅंग्रेस प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली. तर आमदार अमित झनक यांची उपाध्यक्ष पदी निवड झाली आहे. नागपुर येथील काॅंग्रेसच्या देवाडिया भवनात मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण झाली.

[amazon_link asins=’B0784D7NFX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’3a9fcc03-b82d-11e8-a1a7-6b7a44902d99′]

मागील अनेक दिवसांपासून निवडणूक प्रक्रिया सुरु होती. अखेर आज शुक्रवार (ता. 14) रोजी महाराष्ट्र युवक काॅंग्रेसच्या प्रदेश कार्यकारणीचे निकाल जाहीर झाले. सत्यजित तांबे यांनी आमदार अमित झनक यांचा पराभव करत युवक काॅंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी बाजी मारली.  यावेळी तांबे यांना 70 हजार मते मिळाली तर आमदार झनक यांना 34 हजार मते मिळाली. तिसऱ्या क्रमांकावर असणारे भूषम मरस्कोलेंची प्रदेश महासचिव पदी वर्णी लागली आहे.

प्रेमात नापास झालेल्या युवतीचा SSC बोर्डाच्या कार्य़ालयात आत्महत्येचा प्रयत्न

काँग्रेस पक्ष राज्यातील युवकांना सोबत घेऊन काम करणार आहे, युवकांच्या माध्यमातून पक्ष मजबूत करण्याचे काम यापुढील काळात आपण करणार असल्याचे सांगत युवकांना बरोबर घेऊन आपल्याला राहुल गांधी यांना पंतप्रधान करायचे आहे आणि त्यासाठी आपली निवड झाली असल्याचे तांबे म्हणाले.

[amazon_link asins=’B077PWBC7J’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’41b46343-b82d-11e8-b986-1dec357881cd’]

नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे हे काँग्रेस नेते आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे भाचे आहेत. अभ्यासू, आक्रमक आणि तळागाळातील कार्यकर्थ्यांशी नाळ जोडलेला काॅंग्रेसमधील युवानेता अशी त्यांची अोळख आहे.  तांबे यांनी २०१४ साली अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती. शिवाय त्यांनी दोनदा अहमदनगर जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणूनही काम पाहिले आहे. तांबे गेल्या दीड दशकापासून युवक काँग्रेस आणि एनएसयूआयच्या माध्यमातून युवकांना संघटित करण्याचे काम करत आहेत.