Satyajit Tambe | पदवीधर मतदारसंघाच्या निकालाआधीच पुण्यात सत्यजीत तांबे यांच्या विजयाची पोस्टरबाजी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – विविध राजकीय घडामोडींनंतर राज्यातीय राजकीय पक्षांसाठी प्रतिष्ठीत झालेल्या पदवीधर तसेच शिक्षक मतदारसंघाचा (Graduate And Teacher Constituency Result) आज निकाल जाहीर होणार आहे. काँग्रेस पक्षासोबत बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या सत्यजीत तांबे (Satyajit Tambe) यांच्यासाठी ही निवडणुक अतिशय प्रतिष्ठेची मानली जाते. प्रत्यक्ष मतदानाच्या आदल्या दिवशी भाजपकडून सत्यजीत तांबे यांना पाठिंबा देण्यात आला. त्यामुळे सत्यजीत तांबे आणि महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) उमेदवार शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांच्यात चुरशीचा सामना होण्याची शक्यता जाणकारांकडून वर्तविण्यात आली होती. आज (दि.२ फेब्रुवारी) पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाचा निकाल जाहीर होणार आहे. मात्र, पुण्यात हा निकाल जाहीर होण्याअगोदरच सत्यजीत तांबे (Satyajit Tambe) यांच्या विजयाचे पोस्टर लावण्यात आले आहे. त्यावरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

 

सत्यजीत तांबे यांचे पोस्टर पुण्याचे माजी नगरसेवक सनी विनायक निम्हण (Sunny Vinayak Nimhan) यांच्याकडून लावण्यात आले आहेत. मात्र निकाल हाती येण्याअगोदरच हे पोस्टर्स लावण्यात आल्यामुळे त्याची चर्चा अधिक होत आहे. ‘जीत’ सत्याची, विजय ‘नव्या’ पर्वाचा! अशा स्वरूपाचा आशय त्या पोस्टर्सवरती लिहिण्यात आला आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघात भरगोस मतांनी विजयी झाल्याबद्दल आमदार सत्यजीत तांबे (Satyajit Tambe) यांचे अभिनंदन. असे देखील त्या पोस्टर्सवर लिहिण्यात आल्यामुळे त्याची चर्चा अधिक होत आहे.

दरम्यान, काँग्रेस पक्षाचा एबी फॉर्म देण्यात येवून देखील डॉ. सुधीर तांबे (Dr. Sudhir Tambe) यांनी मुलाच्या उमेदवारीसाठी माघार घेतली होती. त्यावरून नाराज झालेल्या काँग्रेस पक्षाकडून तांबे पिता-पुत्रांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. आयत्या वेळी काँग्रेस पक्षाला आणि एकंदरीतच महाविकास आघाडीला शुभांगी पाटील यांना उमेदवारी जाहीर करावी लागली. शुभांगी पाटील यांना भाजपकडून उमेदवारी नाकारण्यात आली होती. मात्र ऐनवेळी महाविकास आघाडीकडे कुठलाही अन्य पर्याय उपलब्ध नसल्यामुळे शुभांगी पाटील यांच्या रूपाने आयात उमेदवाराला उमेदवारी द्यावी लागली.
दुसरीकडे मात्र सत्यजीत तांबे यांना भाजपने आपला अधिकृत उमेदवार घोषीत केला नाही.
मात्र निवडणुकांच्या एक दिवस अगोदर भाजपने सत्यजीत तांबे यांना पाठिंबा जाहीर केला.
त्यामुळे महाविकास आघाडी आणि सत्ताधारी भाजप या दोन्ही पक्षांसाठी नाशिक
पदवीधर मतदारसंघाची निवडणुक प्रतिष्ठेची मानली जाते.
आणि या निवडणुकीत कोण बाजी मारणार? याकडे सबंध राज्याचे लक्ष लागले आहे.

 

 

 

Web Title :- Satyajit Tambe | ex corporator congratulate satyajit tambe before nashik election 2023 posters in pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा