Satyajit Tambe | सत्यजित तांबे यांना सपोर्ट करणाऱ्या काँग्रेस जिल्हाध्यक्षांना पक्षाकडून कारणे दाखवा नोटीस

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेस पक्षाशी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी दाखल करणाऱ्या सत्यजीत तांबे (Satyajit Tambe) यांची कोंडी करण्याचे काँग्रेस पक्षाने ठरविलेले दिसत आहे. त्यासंबंधीचा अधिकृत आदेश पक्षाकडून जारी करण्यात आला नसला तरी, सत्यजीत तांबे यांना पाठिंबा देणारे काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंखे (Balasaheb Salunke) यांना मात्र पक्षाकडून कारणे दाखवा नोटीस पाठविली आहे.

काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंखे हे कर्जत तालुक्यातील असून ते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांचे समर्थक मानले जातात. त्यामुळेच त्यांना काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद मिळाल्याचे बोलले जाते. नाशिक पदवीधर मतदारसंघात नाट्यमय घडामोडी घडत असताना स्थानिक वृत्तपत्रांच्या प्रतिनिधींशी बोलताना बाळासाहेब साळुंके यांनी तांबे यांना पाठिंबा देत असल्याबाबतचे वक्तव्य केले होते. डॉ. सुधीर तांबे यांच्या विरोधात केलेली निलंबणाची कारवाई चुकीची असून त्यात संपूर्ण अहमदनगर जिल्हा काँग्रेस तांबे यांच्या पाठीशी आहे. असे वक्तव्य केले होते. तसेच यावेळी बोलताना त्यांनी सत्यजीत तांबे (Satyajit Tambe) यांच्या कामाचे कौतुक करत त्यांच्यावर अन्याय होत असल्याचे देखील ते यावेळी म्हणाले होते.

या बातमीची कात्रणे प्रदेश कार्यालयात गेली. त्यावर कार्यवाही करत काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस (प्रशासन व संघटन) प्रमोद मोरे यांनी काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंखे यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, ‘आपण नाशिक पदवीधर मतदारसंघातील उमेदवार सत्यजीत तांबे यांना पाठिंबा देणार असल्याचे वृत्तपत्रात प्रसिध्द झाले आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या सुचनेवरून आपल्याला कळविण्यात येते की, ही बातमी आपण प्रसिध्द केली आहे की इतर कोणी? याचा खुलासा प्रदेश कार्यालयाकडे लेखी स्वरूपात पाठवावा.’

यावरून काँग्रेस पक्षात जिल्ह्यात दोन मतप्रवाह आहेत. हे दिसून येते.
काही कार्यकर्ते अजूनही तांबे यांना पाठिंबा देण्याच्या मनःस्थितीत असल्याचे दिसून येते.
तर दुसरीकडे प्रदेश कार्यालयाने घेतलेल्या निर्णयाचे समर्थन करणारे देखील काही कार्यकर्ते आहेत.
सत्यजीत तांबे यांना स्थानिक पातळीवरून पक्षाकडून पाठिंबा मिळू नये.
अशी रणनिती पक्षाकडून आखण्यात येत असल्याचे दिसून येते.
बाळासाहेब साळुंखे हे काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत. त्यामुळे यात त्यांची भूमिका महत्वाची आहे.
त्यामुळे पक्षाने पाठविलेल्या पत्राला ते काय उत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title :- Satyajit Tambe | maharashtra congress show cause notice to ahmednagar congress president balasaheb salunkhe over support satyajeet tambe in nashik gradudate contituency

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Devendra Fadanvis | देवेंद्र फडणवीस यांचे आदित्य ठाकरे यांना जोरदार प्रतिउत्तर; म्हणाले…

Maharashtra By-Election | चिंचवड आणि कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीची तारीख जाहीर