‘या’ दिवशी रिलीज होणार जॉन अब्राहमचा ‘सत्यमेव जयते 2’ !

बॉलिवूड स्टार जॉन अब्राहम (John Abraham) नं आज प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत त्याचा आगामी सिनेमा सत्यमेव जयते 2 च्या रिलीज डेटची घोषणाही केली आहे. यासंदर्भात त्यानं सोशलवर पोस्ट शेअर केली आहे. हा सिनेमा 2021 च्या ईदला रिलीज होणार आहे.

जॉननं त्याच्या इंस्टावरून एक फोटो शेअर केला आहे. यात तो तिरंगा हातात घेऊन पोज देताना दिसत आहे. या त्याचा देशी लुक पहायला मिळत आहे. मिशा, पगडी असा त्याचा लुक लक्ष वेधत आहे. फोटोसोबत त्यानं लिहिलं की, सत्यमेव जयते 2 च्या टीमकडून सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा. आम्ही तुम्हाला 2021 च्या ईदला भेटणार आहोत.

जॉनचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. त्याच्या अनेक चाहत्यांनी या फोटोवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पाडला आहे. अनेकांनी सिनेमाबद्दल उत्सुकता निर्माण झाल्याचं सांगितलं आहे. काहींनी हा फोटो शेअरही केला आहे.

जॉनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच तो पागलपंती या मल्टीस्टारर सिनेमात दिसला आहे. लकवरच तो मुंबई सागा या सिनेमात दिसणार आहे. याशिवाय तो सत्यमेव जयते 2 आणि अटॅक या सिनेमातही काम करत आहे.