‘सत्यमेव जयते’ कायद्याच्या कात्रीत? धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार 

मुंबई: पोलिसनामा ऑनलाईन

धार्मिक भावना दुखवल्याप्रकरणी ‘सत्यमेव जयते’ ह्या चित्रपटावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे कायद्याच्या कात्रीत सापडलेला हा चित्रपट १५ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार की तारीख लांबणार याबाबत संभ्रम आहे.

अभिनेता जॉन अब्राहमची प्रमुख भूमिका असणारा ‘सत्यमेव जयते’ हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच कायद्याच्या कचाट्चायत सापडला असून  एका वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार मिलाप झवेरी दिग्दर्शित या चित्रपटामुळे शिया मुस्लिम समुदायाच्या भावना दुखावल्या गेल्याचे म्हटले जात आहे. मिलाप झवेरी लिखित आणि दिग्दर्शित हा चित्रपट बऱ्याच काळापासून चर्चेचा विषय ठरत आहे.
[amazon_link asins=’B077PWBC7J’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’8762413c-9409-11e8-956a-e18b8b60483e’]
चित्रपटात दाखवलेल्या मातमच्या दृश्यामुळे शिया मुस्लिम समुदायाच्या धार्मिक भावना दुखावल्याचे म्हणत ‘सत्यमेव जयते’च्या मार्गात हा अडथळा आल्याचे समजत आहे . भारतीय जनता पार्टीच्या सय्यद अली जाफरी यांनी याविषयी दाबीपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर सत्यमेव जयते विरोधात धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी भारतीय दंड संहिता कलम २९५ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे वृत्त एका वृत्तपत्राने प्रसिद्ध केले आहे.

जॉन अब्राहम, मनोज बाजपेयी, अमृता खानविलकर, आएशा शर्मा यांच्या या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत. भूषण कुमार, कृष्ण कुमार, मोनिषा अडवाणी, मधू भोजवानी आणि निखील अडवाणी यांची निर्मिती असणारा हा चित्रपट १५ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. परंतु गुन्हा दाखल केल्यामुळे वेळेत प्रदर्शित होईल की नाही याबाबत साशंकता निर्मण झाली आहे.