‘सत्यमेव जयते’चा ट्रेलर अखेर रिलीज

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाईन

बॉलिवूडचा अॅक्शन मॅन म्हणून ओळखला जाणारा जॉन इब्राहिम आणि मनोज वाजपेयी यांचा सत्यमेव जयते  सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. यापूर्वी काही दिवसांपूर्वी त्याचा ‘परमाणू’ हा सिनेमा  रिलिज  झाला होता. परमाणू हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर खूप गाजला होता. या सिनेमाला मोट्या प्रमाणात प्रेक्षकांकडून प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे साहजिकच प्रेक्षकांच्या अपेक्षा जॉन इब्राहिम कडून उंचावल्या होत्या.

[amazon_link asins=’B077PWBC7J’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’24d0e38a-7ac7-11e8-80db-13829cfb3ab4′]

प्रेक्षक अनेक दिवसांपासून ‘सत्यमेव जयते’ च्या ट्रेलरची आशेने वाट पाहत होते, आज अखेर त्या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला. या ट्रेलरमध्ये जॉनने भ्रष्टाचाराविरोधात लढणाऱ्या एका सीरिअल किलरची भूमिका या सिनेमामध्ये साकारली आहे. आपल्या पित्याच्या मृत्यूचा सूड उगवण्यासाठी आणि भ्रष्टाचार संपवण्यासाठी तो एकटाच खाकीच्या रक्षणासाठी खाकीच्याच विरोधात मैदानात उतरला आहे. या लढाईत जॉन अनेकांना संपवतो.  सीरिअल किलरच्या शोधात असलेला पोलीस अधिकाची भूमिका  मनोज मनोज वाजपेयी साकारतो आहे. या सिनेमाची अॅक्शन जबरदस्त आहे. भरपूर अॅक्शन असलेला हा सिनेमा  १५ ऑगस्ट या दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  याच दिवशी अक्षय कुमारचा गोल्ड आणि देओल ब्रदर्सचा ‘यमला पगला दीवाना फिर से’ हा सिनेमा रिलीज होणार आहे. कोणता सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो आहे  तो येणारा काळच ठरवेल.