‘मिर्झापूर’मधील सत्यानंद त्रिपाठी म्हणजेच ‘कुलभूषण’ यांना लोक करताहेत ‘शिवीगाळ; व्यक्त केली खंत

अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडिओ (Amazon Prime Video) वरील मिर्झापूर (Mirzapur) ही वेब सीरिज खूपच गाजली आहे. अलीकडेच या सीरिजचा दुसरा सीजनही (Mirzapur 2) रिलीज झाला आहे. ज्याला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळताना दिसत आहे. यात सत्यानंद त्रिपाठी ही भूमिका म्हणजेच कालीन भैयाच्या (Pankaj Tripathi – पंकज त्रापाठी) वडिलांची भूमिका साकरणारे 76 वर्षीय अभिनेते कुलभूषण खरबंदा (Kulbhushan Kharbanda) सध्या चर्चेत आले आहेत. मिर्झापूर 2 नंतर एकीकडे त्यांच्या कामाचं कौतुक होत आहे, तर काही लोक त्यांना शिवीगाळ करत आहेत. खुद्द कुलभूषण यांनीच याबबात सोशलवरून खंत व्यक्त केली आहे.

https://www.instagram.com/p/CHZf83VB8I4/?utm_source=ig_embed

कुलभूषण खरबंदा यांनी इंस्टावरून एक स्टोरी शेअर केली आहे,. यात त्यांनी लिहिलंय की, लोकांचं प्रेम पाहून छान वाटलं. परंतु काही लोक असेही आहेत जे मेसेजमध्ये मला शिवीगाळ करत आहेत. ते पाहून मला खूप वाईट वाटलं. मी तुम्हा सर्वांना गुड लक देतो. डिजिटल जगात मी नवीन आहे आणि आता शिकत आहे.

https://www.instagram.com/p/CHZf6BDFP_j/?utm_source=ig_embed

मिर्झापूर या वेब सीरिजबद्दल बोलायचं झालं तर गुरमीत सिंह आणि मिहिर देसाई यांनी या सीरिजचं डायरेक्शन केलं आहे. पहिल्या सीजनप्रमाणेच याच्या दुसऱ्या सीजनलाही भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. या सीरिजमधील मुन्ना त्रिपाठी, गुड्डू भैया, कालीन भैया आणि गोलू असे पात्र खूप गाजले आहेत.