सत्यशोधक पुरस्कार अत्यंत प्रेरणादायी, विष्णू ताम्हाणे सत्यशोधक पुरस्काराने सन्मानित

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   महात्मा फुले यांनी सार्वजनिक सत्य धर्माची स्थापना करुन सत्य शोधक समाजाची स्थापना केली. त्यांचा अखंउ सत्य सर्वाचे आदिघर सर्व धर्माचे माहेर याचा आदर्श घेऊन मी पोलीस खात्यातील कर्तव्य प्रामाणिक व चिकाटीने करीत आहे. हा सत्यशोध पुरस्कार अत्यंत प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णु ताम्हाणे यांनी केले.

महात्मा फुले यांच्या १३० व्या स्मृती दिनानिमित्त महात्मा फुले वाडा, कात्रज रासकर पार्क येथे विष्णु ताम्हाणे यांना सत्यशोधक पुरस्कार देऊन सपत्नीक सन्मानित करण्यात आले यावेळी ते बोलत होते.

हा पुरस्काराचे आयोजन अत्यंत आगळ्या वेगळ्या पद्धतीने करण्यात आले होते. पुरस्कार प्रदान करण्यापूर्वी पुरस्कर्ते यांनी आपल्या पत्नीच्या गळ्यात हार अर्पण केला. व नंतर पत्नीने आपल्या पतीच्या गळ्यात हार अर्पण केला. त्यानंतर प्रमुख पाहुणे एकनाथ राऊत यांच्या हस्ते ताम्हाणे यांना सत्यशोधक पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यावेळी ताम्हाणे यांनी सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्यांना गुरु मानले. त्या महात्मा फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त मला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. याबद्दल त्यांनी आभार मानले. रासकर पार्क येथील रहिवासी यांच्या काहीही अडचणी, तक्रारी सोडविण्याचा प्रयत्न करेन.

यावेळी कात्रज परिसरातील सामाजिक कार्यकर्ते नवनाथ झगडे यांनाही सत्यशोधक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमाला सुनील माने, एकनाथ राऊत हे उपस्थित होते. ताम्हाणे यांनी कोरोना काळात केलेल्या कार्याचा सुनील माने यांनी विशेष उल्लेख केला. यावेळी कुमार आहेर यांनी मी महात्मा फुले बोलतोय हा एकपात्री प्रयोगर सादर केला. हनुमंत टिळेकर यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले.

You might also like