बलात्काराचा प्रयत्न करणार्‍याची केली हत्या, महिलेलाच मृत्यूदंड

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतात सतत बलात्काराच्या घडत असून इतरही देशात अशा घटना घडतच असतात. बलात्कार करणाऱ्याला सौदी अरेबियात जशी शिक्षा दिली जाते तशीच शिक्षा भारतातही आरोपींना दिली जावी, अशी मागणी अनेकजण करतात. तर सौदी अरेबियात महिलेने बलात्कार करताना आरोपीला स्वसंरक्षणामुळे ठार केले असता तिला त्याची शिक्षा म्हणून मृत्यू दंडाची शिक्षा सुनावली आहे. एवढेच नाही तर शिक्षेची अंमलबजावणी करायच्या अगोदर तिच्या कुटुंबालाही खबर देण्यात आलेली नाही.

या महिलेचे नाव तुती तुरसीलवाती असून तिला एक लहान मुल असून ती इंडोनेशियन होती. तिला सोमवारी सौदी अरेबिया येथील मक्का प्रांतातील तायफ या शहरात फाशी देण्यात आली. तुती हिने आपल्यावर बलात्कार करणाऱ्या बॉसवर हल्ला केला असताना त्याचा मृत्यू झाला. नंतर तिला अटक करून झालेल्या सुनावणीत फाशीची शिक्षा सुनावली गेली. तसेच तिच्या शिक्षेची सुनावणी करताना तिच्या कुटुंबाला किंवा इंडोनेशियाच्या दूतावासालाही कळवले नसल्याची माहिती समोर आली असून तेथे सरकारविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.

याअगोदरही तेथे चार इंडोनेशियन नागरिकांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली असून त्याबाबत इंडोनेशियन दूतावासाला कोणत्याही प्रकारची माहिती देण्यात आली नव्हती.

You might also like