सौदी अरबमध्ये भीषण अपघात, 35 विदेशी नागरिकांचा मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सौदी अरबमधील पश्चिमी भागात काल संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात 35 विदेशी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता कि, बसचे अक्षरशः तुकडे झाले. त्याचबरोबर अनेकजण या अपघातात जखमी देखील झाले आहेत. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी दवाखान्यात हजर केले असून घटनेचा तपास सुरु केला आहे.

हा अपघात मदिना शहरापासून 170 किलोमीटर दूर असलेल्या हिजरा रोडवरील अल-अखल गावाच्या जवळ झाला असून बुधवारी संध्याकाळी हि घटना घडली आहे. 39 प्रवाशांसह प्रवास करणाऱ्या एका खासगी बसने कंटेनरला धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला. गाडीत प्रवास करत असलेले सर्वजण हे आशियायी आणि अरब वंशाचे होते. मात्र सध्या मिळालेल्या माहितीनुसार, अपघातात मृत झालेल्या व्यक्तींमध्ये अधिक व्यक्ती हे आशियायी वंशाचे आहेत.

दरम्यान, अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींपैकी अनेक जणांची प्रकृती गंभीर असून सध्या मदत आणि बचावकार्य सुरु आहे.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी

Loading...
You might also like