सौदी अरेबियात आता महिला पुरूषांच्या परवानगी शिवाय करू शकणार ‘हे’ काम

रियाध : वृत्तसंस्था – जगात सौदी अरेबिया असा देश आहे, जेथे महिलांसाठी अधिक नियम आहेत. तेथे सौदी अरेबियाच्या शासनाने तेथील महिलांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. अरेबियाच्या सरकारने केलेल्या नवीन नियमानुसार २१ वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या महिलांना पासपोर्टसाठी स्वतःला अर्ज करता येणार आहे. पूर्वीच्या नियमानुसार महिलांना पासपोर्टसाठी स्वतःला अर्ज करता येत नव्हते, त्यांच्या ऐवजी त्यांच्या घरातील पुरूषच त्यांच्यासाठी अर्ज करत होते. तसच सर्व वयस्कर नागरिकांना विदेशात जाण्याची परवानगी मिळणार आहे.

सौदीमध्ये महिलांना आपल्या मुलांचा जन्माची नोंद, लग्न किंवा काडीमोड झाल्यास त्याचे शासनात माहिती देण्याचाही अधिकार नव्हता. तोही आता त्यांना मिळणार आहे. कोणत्याही गोष्टीची नोंद करायची असल्यास महिलाही या नोंदी करू शकतात. सर्व नागरिकांना लैंगिक भेदभाव न करता सर्व काम करण्याचा अधिकार मिळणार आहे. अशा प्रकारच्या सर्व कामांसाठी महिलांना पूर्वी पुरूषांची परवानगी घ्यावी लागत होती. नवरा, वडिल किंवा घरातील पुरुषांवर या महिला अवलंबुन असायच्या. त्यामुळे त्यांना महत्त्वाचे निर्णयही सर्व पुरुषच घेत होते.

सौदी शासनाने केलेल्या नव्या नियमांमुळे महिलांच्या आयुष्यात मोठा बदल होणार. जगातील मानवाधिकार संस्था पूर्वीपासून सांगत होती की सौदी पुरुषप्रधान देश असून ते महिलांना दुय्यम दर्जा देतात. त्यामुळे सौदीच्या शासनाने खुप नवीन आणि मोठे बदल केले आहेत. सरकारच्या या निर्णयाचा तेथील महिलांनीही स्वागत केले आहे.

दरम्यान, युएसमधील सौदीच्या राजदूत रीमा बंदार अल सउद यांनी सांगितल्यानुसार, सौदीचे सरकार सध्या आपले काम आणि नागरिकांच्या कायद्यावर संशोधन करत आहेत. त्यामुळे समाजातील महिलांचा दर्जा वाढेल. तसंच आता महिला स्वतंत्रपणे प्रवास करू शकतात.

आरोग्यविषयक वृत्त