सौदी अरेबियाची मोठी घोषणा ! नागरिक आणि प्रवाशांसाठी Covid-19 लस दिली जाणार मोफत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   सौदी अरेबियाच्या आरोग्य मंत्रालयाने संसर्ग रोखण्यासाठी 70 टक्के नागरिक आणि प्रवासी यांना मोफत लस दिली जाणार असल्याचे जाहीर केले आहे. अरब न्यूजच्या वृत्तानुसार, अधिकाऱ्यांना आशा आहे की पुढील वर्षाच्या अखेरीस लसीकरणाचे लक्ष्य गाठले जाईल.

सौदी अरेबियामधील नागरिकांना कोविड -19 लस मोफत

आरोग्य मंत्रालयाचे उच्चपदस्थ अधिकारी अब्दुल्ला असिरी म्हणाले, “ज्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली नाही, त्यांनादेखील येत्या काही महिन्यांत सुरू करण्यात येणा-या लस मोहिमेमध्ये प्राधान्य दिले जाईल.” जोपर्यंत चाचणी किंवा परीक्षणात हे सिद्ध होत नाही की 16 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांना लस आवश्यक आहे, तोपर्यंत त्यांना ती दिली जाणार नाही.

ते म्हणाले की, सौदी अरेबियाने येत्या आठवड्यात देशातील लशींशी संबंधित वेळापत्रक जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे.

दोन मार्गांनी मोठ्या प्रमाणात लस घेण्याची योजना

ते म्हणाले की, लस मिळवण्यासाठी सौदी अरेबिया दोन मार्गांनी काम करत आहे. पहिला मार्ग कोवॅक्स संस्थेद्वारे आहे. जी 20 ची संघटना तयार करण्यात आणि आर्थिक साह्य देण्यात भूमिका आहे. या सुविधेद्वारे सौदी अरेबियाला मोठ्या प्रमाणात लस मिळू शकेल, तर दुसरा मार्ग म्हणजे मोठ्या कंपन्यांशी संपर्क साधून थेट लस घेणे. या माध्यमातून कोवॅक्स संस्थेतील उर्वरित कमतरता पूर्ण होईल.

कोवॅक्स हा एक जागतिक पुढाकार आहे, ज्याचा उद्देश लस उत्पादकांशी काम करणे आणि एकदा परवाना व मान्यता मिळाल्यानंतर जगातील देशांना सुरक्षित आणि प्रभावीपणे लस प्रदान करता येतील. डॉ. अब्दुल्ला म्हणाले की, प्रभावी लस मिळण्यासाठी एक लांब योजना आणि पुरवठा साखळी आवश्यक आहे आणि त्याचबरोबर ही लस मोठ्या प्रमाणात गरजू देशांपर्यंत पोहाेचवायला वेळ लागतो.

You might also like