सौदी अरेबियातील विद्यार्थ्यांना शिकवलं जाणार रामायण आणि महाभारत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्य मुस्लिम देश असलेला सौदी अरेबियानं विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात एक अनोखाच बदल केल्याचे बघायला मिळाले आहे. या देशाने त्या अभ्यासक्रमात रामायण आणि महाभारत या हिंदू महाकाव्यांचा समाविष्ट यामध्ये करण्यात आला आहे. सौदी अरेबियाचे राजपुत्र मोहम्मद बिन सलमान यांच्या Vision 2030 या अनुषंगाने या अभ्यासक्रमात समाविष्ट केला आहे. तर इतर देशातील इतिहास विविध संस्कृती यांची माहिती अभ्यासक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

विद्यार्थ्यांना या व्हिजनच्या माध्यमातून रामायण आणि महाभारत शिकवलं जाणार असल्यामुळे त्यांच्या सांस्कृतिक ज्ञानात भर पडण्यास मदत होणार आहे. भारतीय संस्कृतीचा मुख्य भाग असलेल्या आयुर्वेदाच्या शिक्षणावरही नव्या अभ्यासक्रमात भर दिला जाणार आहे. असे इंडिया टुडेने माहिती दिली आहे. तसेच, सौदी अरेबिया देशाच्या इंग्रजीचे शिक्षणही बंधनकारक केलं गेलं आहे. तर या देशाने नव्या शिक्षण पद्धतीसंदर्भात घेण्यात येणारे सर्व आक्षेप फेटाळून लावले आहेत. तसेच, सर्वसमावेशक, उदार आणि सहिष्णू समाजचं भविष्य घडवण्यासाठी हा अभ्यासक्रम उपयोगी पडेल अशी भावना Nouf-al-Marwai या ट्विटर युझरनं व्यक्त केली आहे.

दरम्यान, तसेच ज्यांनी ट्विट केलं त्यांनी त्यांच्या मुलाच्या अभ्यासक्रमाचा स्क्रीन शॉट देखील ट्विटरच्या माध्यमातून प्रसारित केला आहे. यात विविध संस्कृतींचा समावेश आहे. तर माझ्या शाळेतील मुलाच्या सोशल अभ्यास या विषयाच्या अभ्यासक्रमाचा हा स्क्रीनशॉट आहे. यामध्ये हिंदू धर्म, बौद्ध धर्म, रामायण, महाभारत, कर्म आणि इतिहास यांचा समावेश आहे. या विषयाांचा अभ्यास माझ्यासाठी देखील खूप उपयोगी ठरत आहे. अशी देखील भावना त्यांनी व्यक्त केली आहे.