‘कंगाल’ पाकिस्तानला आता ‘सौदी अरब’नं दिला ‘हा’ जबरदस्त ‘झटका’ !

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – सौदी अरबने पाकिस्तानच्या मेडिकल क्षेत्रात देण्यात येणाऱ्या MS/MD ची मान्यता रद्द केली आहे. आता पाकिस्तानी डॉक्टर सौदी अरबमध्ये काम करु शकणार नाहीत. सौदीच्या या निर्णयानंतर पाकिस्तानमधील प्रशिक्षित अनेक डॉक्टर बेरोजगार होणार आहेत. सौदीत काम करणाऱ्या अनेक डॉक्टरांना निलंबित करण्यात आले आहे. काहींना पाकिस्तानात परत जाण्यास सांगण्यात आले आहे. सौदीच्या या निर्णयानंतर कतार, युएई व इतर देशांनी देखील या संबंधित कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

सौदीच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे की पाकिस्तान एमएस आणि एमडी या कार्यक्रमाच्या ट्रेनिंग मध्ये सहभागी नाहीत आणि मोठ्या पदावरील नियुक्त प्रोफेशनल्ससाठी हे अनिवार्य आहे.

सौदीच्या आरोग्य विभागाने अनेक पाकिस्तानी डॉक्टरांना टर्मिनॅशनल लेटर पाठवले आहेत. सौदीच्या आरोग्य विभागाने सांगितले आहे की व्यवसायिक योग्यतच्या कारणाने अनेक अर्ज रद्द करण्यात आले आहेत कारण नियमांनुसार आता पाकिस्तानी डाग्री स्वीकार्य नसणार आहे.

अनेक पाकिस्तानी डॉक्टरांची भरती सौदीच्या आरोग्य मंत्रालयामध्ये केली होती. सौदीने ऑनलाइन २०१६ साली अर्ज मागवल्यानंतर कराची,लाहोर आणि इस्लामाबादमध्ये मुलाखती घेण्यात आल्या होत्या.

एका पाकिस्तानी डॉक्टरने सांगितले की हा निर्णय अत्यंत गंभीर आहे कारण सौदीमध्ये भारत, सुदान, बांग्लादेशच्या डिग्री मान्य आहेत.

पाकिस्तानच्या एसोसिएशन ऑफ यूनिवर्सिटी फिजीशियन अॅण्ड सर्जन्सचे प्रवक्ता डॉ. असद नूर यांनी सांगितले की, देशासाठी हा एक मोठा धक्का आहे. ते म्हणाले, सौदीच्या डॉक्टरांच्या नोकऱ्या जाण्याने पाकिस्तानच्या रेमिटेंस (परदेशात वास्तव्यास असणार पाकिस्तानी नागरिकांनी पाठवलेले पैसे) चे मोठे नुकसान होईल.