सौदी अरेबियाचा ऐतिहासिक निर्णय ! प्रथमच ‘पर्यटक व्हिसा’ जारी करणार

सौदी अरेबिया : वृत्तसंस्था – पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सौदी अरेबियाने पर्यटक व्हिसा जारी करण्याचा निर्णय घेतला आहे. जागतिक पर्यटन दिनाच्या निमित्ताने सौदी अरेबियाने ही घोषणा केली आहे. सौदीच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेचे तेलावरील अवलंबन कमी करून पर्यटनाला महत्त्व देण्यासाठी प्रिन्स सलमानने देखील व्हिजन 2030 ह्या उपक्रमाची देखील घोषणा केली आहे. यापूर्वी केवळ सौदीला नोकरीसाठी येणार्‍या लोकांना, त्यांची कुटुंबे आणि मक्का-मदिनाला जाणार्‍या मुस्लिम यात्रेकरूंना व्हिसा देण्यात येत होता.

आपल्या नव्या निर्णयाची माहिती देताना सौदीचे पर्यटनमंत्री अहमद अल-खतीब म्हणाले की, ‘हे एक ऐतिहासिक पाऊल आहे. आमच्याकडे पाच युनेस्को जागतिक वारसा साइट्स, स्थानिक संस्कृती आणि अफाट नैसर्गिक संपत्ती आहे. सौदी अरेबिया 49 देशांतील नागरिकांसाठी ऑनलाईन टूरिस्ट व्हिसा अर्ज सुरू करेल. तसेच परदेशी नागरिकांनाही नियमांमध्ये शिथिलता मिळेल. तर इतर जण दूतावास आणि परराष्ट्रातील दुतावासांमध्ये अर्ज करु शकतात. सौदी अरेबियाने विदेशी पर्यटक महिलांवरील बुरखा सक्ती हटवली आहे. अगदी आब्याशिवाय (चेहरा झाकून घेतलेले) ते रस्त्यावर फिरू शकतात. पण, त्यांना सभ्य कपडे घालावे लागतील.

सौदीमध्ये कठोर नियमांमध्ये सूट
प्रिन्स मोहम्मद बिन सलमान सत्तेत आल्यापासून महिलांना मोठ्या प्रमाणात आपले हक्क मिळाले आहेत. सरकारने तिथल्या कठोर नियमांपासून तेथील महिलांना सूट देण्यात आली आहे. अलीकडेच सौदी अरेबियाने पुरुषांशिवाय महिलांना देखील परदेशात प्रवास करण्यासाठी कायदा केला आहे. महिलांना त्यांच्या पसंतीनुसार लग्न करण्याचीही परवानगी मिळाली आहे. काही दिवसांपूर्वीच सौदीतील महिलांना वाहन चालवण्याचा परवाना मिळण्याचा कायदा करण्यात आला आहे. इतकेच नाही तर 2020 पर्यंत 3 दशलक्ष महिलांना ड्रायव्हिंग लायसन्स देण्याचेही लक्ष्य आहे.

व्हिजन 2030 प्रभाव
सौदी अरेबियाची जगातील सर्वात कट्टरपंथीय देश म्हणून ओळखला जातो. या देशात महिलांमध्ये अनेक निर्बंध लादण्यात आले होते. पण आता व्हिजन 2030 अंतर्गत तेल निर्यातीतून होणाऱ्या महसुलावरील आपले अवलंबित्व कमी करायचे आहे. प्रिन्स सलमान यासाठी देशात नियमांत अनेक बदल करत आहे. महिलांवरील निर्बंध व नियम शिथिल करण्यासह सौदी अरेबियातील लोकांच्या रोजगाराच्या संधी वाढविण्याचे निर्णय घेण्यात आले आहेत.

Visit : Policenama.com