देशातील सर्वात मोठी ‘परदेशी’ गुंतवणूक ! सौदीची ARAMCO करणार रिलायन्सच्या ऑईल एंड केमिकल बिजनेसमध्ये 20% ‘भागीदारी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील सगळ्यात मोठ्या रिलायन्स इंडस्ट्रीची वार्षिक मिटिंग पार पडली. या वेळी कंपनीचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी सांगितले की,२०१९ मध्ये कंपनीने पुन्हा एकदा उत्तम कामगिरी केली आहे. मागच्या वर्षी सुद्धा रिलायन्स सगळ्यात जास्त नफा कमावणारी कंपनी ठरली होती. अंबानी यांनी सांगितले की Oil-to-chem biz मधे Saudi Aramco सुद्धा गुंतवणूक करणार आहे. परदेशी गुंतवणूकी पैकी ही सर्वात मोठी गुंतवणूक ठरणार आहे. यामध्ये Saudi Aramco ची २० % भागीदारी असणार आहे.

Saudi Aramco नेमकं काय करते

सौदी अरामको ही कंपनी तेलाची असून जगातील सर्वात जास्त फायदा कमावणारी ही कंपनी आहे. सौदी अरेबियाची या कंपनीने नुकतेच आपल्या प्रॉफीटबद्दल माहिती दिली होती. अरामकोची २०१८ चे प्रॉफिट १११,१ अरब डॉलर होते. जे की जगातील कोणत्याच व्यवसायातील कोणत्याच कंपनीचे नाही.

नेमका काय आहे प्लॅन

मुकेश अंबानी यांनी याबाबत माहिती दिली की, अरमको आरआईएल आयल एंड केमिकल बिजनेसमध्ये २० % हिस्सेदारी करणार आहे आणि यासाठी ते रिलायन्स इंडस्ट्रीमध्ये ७५ बिलियन डॉलरची गुंतवणूक करणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त –