कच्च्या तेलाच्या किंमतीत 28 वर्षातील सर्वाधिक वाढ, भारतात पेट्रोल 7 रूपयांनी महाग होणार ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगातील सर्वात मोठी तेल उत्पादक कंपनी सऊदी अरामको हिच्यावर झालेल्या द्रोण हल्ल्यानंतर सोमवारी कच्च्या तेल्याच्या किमतींमध्ये मोठी वाढ झालेली पाहायला मिळाली. 28 वर्षांमधील सर्वात जास्त वाढ आज झाली. आंतरराष्ट्रीय बाजारात बेंट कच्या तेलाच्या किमतीमध्ये 20 टक्के भाववाढ झाली आहे. 14 जानेवारी 1991 नंतर पहिल्यांदा एकाच दिवसात इतक्या मोठ्या प्रमाणात भाववाढ झालेली पाहायला मिळाली.

यामुळे याचा भारतावर देखील मोठा फरक पडणार आहे. जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, यामुळे भारतात देखील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. पुढील 15 दिवसांमध्ये पेट्रोलच्या दरात लिटरमागे 5-7 रुपये वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महागाई देखील मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. हूथी विद्रोही संघटनेने सौदी अरबमधील अरामको तेल कंपनीच्या प्लॅन्टवर ड्रोन हल्ला केल्यानंतर त्यांनी आपले उत्पादन निम्म्यावर आणले आहे. त्यामुळे आणखी दोन ते तीन दिवस हे उत्पादन बंद राहणार आहे. त्यामुळे कच्च्या तेलाची किंमत 71.95 डॉलर प्रति बॅरलवर गेली आहे.

भारतात 7 रुपयांपर्यंत महागणार पेट्रोल

अंतरराष्ट्रीय बाजारात वाढलेल्या तेलाच्या किमतींमुळे याचा भारताला मोठा फटका बसणार आहे. भारत सौदी अरेबियाकडून मोठ्या प्रमाणावर तेल आयात करत आहे. त्यामुळे वाढलेल्या किमतीचा थेट परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवर केला आहे. या महिन्यात तेलाच्या किमती 80 डॉलर प्रति बॅरलवर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोलच्या किमतीत लिटरमागे 5 ते 7 रुपयांची वाढ होणार आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like