#VideoViral : ‘या’ अभिनेत्रीच्या घराते घुसले ‘माकड’ आणि…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री सौंदर्या शर्माच्या घरात अचानक माकड घुसलं आहे. या माकडाने सकाळची न्याहरी उरकली आहे त्याने तिथून पळ काढला. या माकडाचा एक मजेशीर व्हिडीओ समोर आला आहे. सौंदर्याने हा व्हिडीओ तिच्या इंस्टावरून शेअर केला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशलवर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. माकड खाताना दिसत आहे. माकडाच्या किस्सा शेअर केल्याने सौंदर्या पुन्हा चर्चेत आली आहे.

Advt.

या व्हीडीओला शेअर करताना सौंदर्यांने खास कॅप्शनही दिले आहे. कॅप्शनमध्ये सौंदर्या लिहिते की, “ठग लाईफ… तो सकाळी माझ्या घरात घुसला. सकाळचा नाश्ता केला. त्याशिवाय त्याने बाहेर जाणे स्पष्ट नाकारले. नाश्ता केल्यानंतर त्याने माझ्या बेडवर झोपून आराम केला. यावेळी मी आरडा ओरडा करत होती, रेकॉर्डिंग करत होती कारण माझ्याकडे दुसरा कोणता पर्याय नव्हता. या व्हिडीओला एका दिवसात तब्बल एक लाखांहून अधिक लोकांनी पाहिले आहे.

सौंदर्याच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, सौंदर्या 2017 मध्ये रांची डायरीज या सिनेमात शेवटची दिसली होती. या सिनेमात ती दिग्गज अभिनेता अनुपम खेर, हिमांश कोहली, जिमी शेरगिल आणि सतीश कौशिक यांच्यासोबत काम करताना दिसली होती. त्यानंतर ती कोणत्याही सिनेमात दिसली नाही.