सौरभ चौधरीला सुवर्णपदक, अभिषेक वर्माला कांस्यपदक

जकार्ता : वृत्तसंस्था 

आशियाई खेळांमध्ये सलग तिसऱ्या दिवशी नेमबाजांनी भारताला पहिलं पदक मिळवून देण्याची कामगिरी केली. १० मी एअर पिस्टलमध्ये भारताच्या सौरभ चौधरीने सुवर्णपदक तर अभिषेक वर्माने कांस्यपदक पटकावले.  अंतिम फेरीत सौरभने जपानच्या टी. मस्तुदाला मागे टाकत भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं. याच प्रकारात भारताच्या अभिषेक वर्माला कांस्यपदक मिळालं आहे. पात्रता फेरीतही सौरभ चौधरीने अव्वल स्थान पटकावलं होतं. अंतिम फेरीतही सौरभ आणि अभिषेक यांनी मातब्बर खेळाडूंची झुंज मोडून काढत पदकांच्या शर्यतीत आपलं स्थान कायम राखलं.

[amazon_link asins=’B072X2BGM5,B01N54ZM9W’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’5cfcf214-a514-11e8-b69f-5b6463c89ad7′]

चुरशीच्या या लढतीत मोक्याच्या क्षणी १६ वर्षीय सौरभने आपला गेम उंचावर सुवर्णपदक आपल्या नावावर कोरले. आशियाई खेळांमध्ये सलग तिसऱ्या दिवशीही नेमबाजांनी भारताला उत्साहित केलं. अंतिम फेरीत सौरभने जपानच्या टी. मस्तुदाला मागे टाकत भारताच्या नावावर एक सुवर्णपदक कमावले. १० मीटर एअर पिस्टल प्रकारात दिग्गजांना मागे टाकत १६ वर्षीय सौरभची कामगिरी ही नक्कीच कौतुकास्पद आहे. याच वर्षी जूनमध्ये झालेल्या ज्युनिअर शुटिंग वर्ल्ड कपमध्येही सौरभने सुवर्णपदक पटकावले होते. या वर्ल्डकपमध्ये सौरभने वर्ल्ड रेकॉर्डही केला होता.

भारतीय नेमबाजांनी आतापर्यंत देशाच्या खात्यात ५ पदकं टाकली आहेत. पहिल्या दिवशी अपुर्वी चंदेला-रवी कुमार जोडीने १० मी. एअर रायफल प्रकारात कांस्यपदकाची कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी दिपक कुमारने १० मी. एअर रायफल प्रकारात रौप्यपदकाची कमाई केली. यानंतर ट्रॅप नेमबाजीत भारताच्या लक्ष्य शेरॉनने रौप्य पदकाची कमाई केली होती.