सौरभ राव यांनी पुणे विभागीय आयुक्तपदाचा पदभार स्विकारला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसच्या संकटाचा सामना करण्यासाठी सध्या पुणे विभागीय आयुक्तालयात विशेष कार्य अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या सौरभ राव यांची आज पुण्याच्या विभागीय आयुक्त पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. मावळते विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्याकडून सौरभ राव यांनी पुण्याच्या विभागीय आयुक्त पदाचा पदभार स्विकारला आहे.


सौरभ राव यांनी यापुर्वी पुणे जिल्हयाचे जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त तसेच राज्य साखर आयुक्त पदावर काम केले आहे. दरम्यान, नवे विभागीय आयुक्त सौरभ राव हे माझ्यापेक्षा अधिक चांगल्या प्रकारे सध्याच्या परिस्थिती हाताळतील, कोरोनाच्या संकटातून मार्ग काढतील असे डॉ. दिपक म्हैसेकर म्हणाले. आपण पुण्यातच स्थायिक होणार असून सामाजिक सेवेत कार्यरत राहणार असल्याचे म्हैसेकर यांनी स्पष्ट केले आहे.