Savarkar Gaurav Yatra | ‘सावरकर गौरव यात्रे’ला मुंडे भगिनींची दांडी, राजकीय चर्चांना उधाण; खरं कारण आलं समोर

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress Leader Rahul Gandhi) यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर (Swatantra Veer Savarkar) यांच्याबद्दल खालच्या स्तरावर केलेल्या टीकेचा निषेध करण्यासाठी भाजप (BJP) आणि शिंदे गटाकडून (Shinde Group) राज्यभर सावरकर गौरव यात्रा (Savarkar Gaurav Yatra) काढली जात आहे. गुरुवारी बीड जिल्ह्यातील सावरकर गौरव यात्रेत (Savarkar Gaurav Yatra) भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि खासदार प्रीतम मुंडे (MP Pritam Munde) या गैरहजर राहिल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं.

 

 

बीड जिल्ह्यात काढण्यात आलेल्या सावरकर गौरव यात्रेमध्ये (Savarkar Gaurav Yatra) जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील स्थानिक नेते मंडळी उपस्थित होते. मात्र पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे या दोघींनी दांडी मारली. त्यामुळे राजकीय वर्तुळात (Maharashtra Politics News) पुन्हा चर्चा सुरु झाल्या. पक्षाचा कार्यक्रम असताना या क्रार्यक्रमास दोन्ही बहिणी उपस्थित का राहिल्या नाहीत? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

 

 

खरं कारण आलं समोर

 

मुंडे भगिनी बीडमधील सावरकर गौरव यात्रेला उपस्थित न राहण्याचे कारण समोर आलं आहे.
दिल्लीत संसदेचं अधिवेशन (Parliament Session) सुरु आहे. त्यामुळे खासदार प्रीतम मुंडेंना अधिवेशन सोडून येता येत नाही.
पक्षाचा व्हिप असल्यामुळे त्या येऊ शकत नसल्याचं त्यांच्या कार्यालयाच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं आहे.

तर पंकजा मुंडे ह्या मुंबईत भाजपच्या स्थापना दिनाच्या (BJP Foundation Day) कार्यक्रमाला हजर होत्या, त्यामुळे त्या बीडमध्ये जावू शकल्या नाहीत. तसंही मुंडे भगिनींचं कार्यक्रम पत्रिकेत नाव नव्हतं. त्यामुळे त्यांच्या उपस्थितीची शक्यताही नव्हतीच, असं सांगण्यात येतंय. याबाबत एका वृत्तवाहिनीने वृत्त दिले आहे.

 

Web Title :- Savarkar Gaurav Yatra | absence of pankaja munde and pritam munde in savarkar gaurav yatra in beed


Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update


हे देखील वाचा

 

Pune Chandani Chowk | 10 एप्रिलपासून चांदणी चौकातील वाहतूक बंद राहणार, जाणून घ्या पर्यायी मार्ग

Pune Crime News | कोंढव्यात 46 लाखांचे अमली पदार्थ जप्त

Vision Cup ODI (50 Overs) Cricket Tournament | ‘व्हिजन करंडक’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा ! सिंहगड इलेव्हन संघाचा सलग दुसरा विजय