पोलीस अधिकारी बनून वृद्धांना लुटणाऱ्या ‘सावधान इंडिया’ मधील ॲक्टरला अटक !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – प्रसिद्ध टीव्ही मालिका सावधान इंडिया (Savdhaan India) मधील ॲक्टरला क्राईम ब्रांचनं दरोड्याप्रकरणी अटक केली आहे. 40 वर्षीय हा ॲक्टर कथितपणे पोलीस अधिकारी बनून वृद्धांना लुटत होता.

समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी सलमान जाफिर (जाकिर) जास्त करून देहरादून आणि चंदीगढ मधील लोकांना लुटत होता. मुंबईतून तो फ्लाईटनं प्रवास करत असे. आता मुंबई क्राईम ब्रांचनं ट्रांजिट रिमांडवर याला देहरादून पोलिसांच्या हवाली केलं आहे.

एका इंग्रजी वृ्त्तानुसार, या व्यक्तीला मुंबई पोलीस (वेस्ट), देहरादूनच्या पटेल नगरचे पोलीस आणि क्राईम ब्रांच युनिटनं जॉईंट ऑपरेशन करत अटक केली आहे.

देहरादून पोलिसांनी आरोपीवर एका वृद्ध महिलेचे 5 लाखांचे सोन्याचे दागिने लुटल्याची केस दाखल केली आहे. रिपोर्टनुसार, आरोपीनं त्याचा गुन्हा मान्य केला आहे. कोणतं काम नसल्यानं त्यानं असं केल्याचं सांगितलं आहे.

अधिकाऱ्यांनुसार, या आरोपीनं अनेक टीव्ही मालिकेत काम केलं आहे. यात सावधान इंडिया, चित्तौडगढ की राजकुमारी पद्मिनी, छत्रपती शिवाजी राजा अशा काही मालिकांचा समावेश आहे.