‘बेटी बचाव बेटी पढाव’ नाही भाजपा वालो से बेटी बचाव :अशोक चव्हाण

 पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन 

बेटी बचाव बेटी पढाव नही भाजपा वालो से बेटी बचाव अस म्हणायची वेळ ही दुर्दैवाने देशावर आली आहे.अस म्हणत घाटकोपर चे आमदार यांनी तरुणींबद्दल केलेलं बेताल वक्तव्या चा खरपूस समाचार घेत भाजपाला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी लक्ष केलं,ते पिंपरी-चिंचवड मध्ये जन संघर्ष यात्रेच्या जाहीर सभेत बोलत होते.यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,हर्षवर्धन पाटील,रत्नाकर महाजन,बाळासाहेब थोरात,शहराध्यक्ष सचिन साठे आदी उपस्थित होते.

ते म्हणाले की,एकीकडे बेटी बचाव बेटी पढाव चा नारा दिला जातो आणि भाजपाचे आमदार राम कदम हे अकलेचे तारे तोडतात.गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रासह देशात मोठं वादळ सुरू आहे.ते वक्तव्य करणारे आमदार राम कदम हे महाराष्ट्राला कलंक आहेत.मुलींना उचलून घेऊन जाण्यासाठी आमदार झालात का? अशी वर्तणूक करायला लाज वाटत नाही नाही का अस चव्हाण म्हणाले.

हिंदू समाज एकत्र आला तरच प्रगती : डॉ. मोहन भागवत

हे सर्व सुरू असताना मुख्यमंत्र्यांच्या तोंडून एक शब्द निघत नाही,भाजपा नेते बोलत नाहीत.पोलीस गुन्हा दाखल करून घेत नाहीत.अद्याप काही करायचं नाही असा आदेश वरून पोलिसांना आहे असं चव्हाण म्हणाले.बेटी बचाव बेटी पढाव नाही तर भाजपा वालो से बेटी बचाव अस म्हणायची वेळ दुर्दैवाने या देशावर आली आहे.हे सहनशीलतेच्या पलीकडे चालेल आहे.ही मंडळी अशीच राहिली तर मुलींना आणि महिलांना रस्त्यावर चालणं शक्य होणार नाही.यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.चार वर्षांपूर्वी सत्ता मिळालेल्या मंडळींनी बेभान होऊन वाटेल ते बोलत आहेत.आणि जनता सहन करत आहे.राज्याचे प्रमुख यावर काही निर्णय घेत नाहीत अस चव्हाण म्हणाले.

पैश्यातून सत्ता आणि सत्तेतून पैसा हे समीकरण भाजपाला अवगत झालं आहे.त्यांनी महाराष्ट्रासह इतर राज्यातील निवडणूक जिंकल्या.आगामी काळात हीच पद्धत आंगीकारून आम्ही पुन्हा सत्तेवर येऊ शकतो एवढी मस्तवाल झालेलं मंडळी आहेत.गेल्या चार वर्ष्यात घोषणा झाल्या,त्यांच्या पेपर मध्ये जाहिराती देखील दिल्या मात्र त्या ९९ टक्के बोगस निघाल्या असून जनतेची दिशाभूल करण्याचं काम भाजपाने केलं आहे.भाजपाकडे घोषणांचा मोठा कारखाना आहे.केवळ घोषणा सुरू आहेत.प्रत्येक्ष कृती मध्ये काही होत नाही अस अशोक चव्हाण म्हणाले.

[amazon_link asins=’B00KNN4N4I,B009WNA9V6′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’91809b37-b320-11e8-80c1-ff8bed7fab2d’]