कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून ‘असे’ वाचवा लहान मुलांना; डॉक्टरांनी दिला महत्वाचा सल्ला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  देशात कोरोना व्हायरसचे थैमान सुरू असून, रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ही रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. देशभरात लसीकरणाची व्याप्तीही वाढवण्यात आली आहे. त्यात लहान मुलांचे बाधित होण्याचे प्रमाणही वाढताना दिसत आहे. पण त्यापासून वाचण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिला आहे.

कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत लहान मुलेही काही प्रमाणात संक्रमित झाली आहेत. मात्र, तिसऱ्या लाटेतही या लहान मुलांना धोका उद्भवण्याचा इशारा तज्ज्ञांकडून दिला जात आहे. देशात 12 वर्षांपेक्षाही कमी वयोगटाची मोठी लोकसंख्या आहे. भारतात 12 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांची संख्या ही 16.5 कोटी आहे. जर तिसऱ्या लाटेत त्यांच्यापैकी 20 टक्के जरी कोरोनाबाधित झाले तर त्यापैकी 5 टक्के मुलांना आयसीयूची गरज लागणार आहे. प्रत्येक घरात लहान मुले आहेत, त्यांना कोरोनाच्या लाटेपासून संरक्षण देणे गरजेचे आहे. कार्डियाक सर्जन डॉ. देवी शेट्टी यांनी यावर पालकांना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.

संभाव्य धोका पाहता 1.65 लाख पीडियाट्रिक आईसीयू बेड्स लागणार आहेत. आजच्या परिस्थितीत देशभरात आपण मोठ्यांसाठी 90 हजार आयसीयू बेड आणि लहान मुलांसाठी 2000 आयसीयू बेडवर उपचार केले जात आहेत. लहान मुलांना आयसीयूमध्ये त्यांची आई किंवा वडिलांशिवाय ठेवता येणार नाही. वयस्कर नागरिकांना आयसीयूमध्ये नर्स, डॉक्टर सांभाळतात. मात्र, लहान मुले त्यांच्याकडे राहू शकत नाहीत. कोरोना आयसीयूमध्ये लहान मुलांना सीडेटदेखील करता येत नाही, कारण त्यांना ऑक्सिजन पातळी सांभाळण्यासाठी योग्य श्वास घेण्याची गरज असते.

लसीचा खर्च किती ?

पहिला डोस 800 ते 1500 रुपये एवढा आहे. दोन्ही पालकांना दोन डोसचा खर्च हा 3200 ते 6000 रुपयांमध्ये होणार आहे. हा खर्च नोकरी करणाऱ्या किंवा कमी उत्पन्न असलेल्या लोकांसाठी जास्त आहे.