ATM मधून नाही मिळाली ‘कॅश’ तर परेशान होऊ नका, ‘ही’ सुविधा येईल तुमच्या कामाला, जाणून घ्या

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –  देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यामुळे 3 मे पर्यंत लॉकडाऊन आहे. लॉकडाऊनचा हा दुसरा टप्पा असून पहिला टप्प्यात 24 मार्च ते 14 दरम्यान लॉकडाऊन लागू होते. पहिल्या टप्प्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने लॉकडाऊन पुन्हा वाढवण्यात आले. त्यामुळे लोकं आपल्या घरात बंद आहेत. या दरम्यान तुम्ही एटीएममधून पैसे काढण्यासाठी बाहेर जात असाल आणि पैसे मिळत नसतील तर काळजी करण्याची गरज नाही. आम्ही तुम्हाला कॅश व्यतिरिक्त इतर पर्यायांबद्दल माहिती देत आहोत, ज्यामुळे तुम्हाला मदत होऊ शकते.

प्लास्टिक मनी

प्लास्टिक मनीमुळे रोख रक्कमेवर अवलंबून राहणे खूपच कमी झाले आहे. डेबिट आणि क्रेडिट कार्डच्या सोयीमुळे लोक रोख रक्कमे ऐवजी कार्डचा वापर करत आहेत. व्यावहारावर आधारित बँक ऑनलाईन सेवा शुल्क घेते, हे शुल्क प्रत्येक बँकेसाठी वेगवेगळे आहे. अशाच नेट बँकिंग आणि मोबाइल बँकिंग सेवांबद्दल जाणून घ्या…

एनईएफटी (NEFT) /आरटीजीएस (RTGS)

नॅशनल इलेक्ट्रॉनक फंड ट्रान्सफर (NEFT) पेमेंट सिस्टीम फंड टू फंड ची सुविधा मिळते. या ठिकाणी किमान आणि कमाल मर्यादा नाही. परंतु प्रत्येक व्यवहारावर काही बँका मर्यादा घालू शकतात. रीअल टाईम ग्रॉस सेटलमेंट (RTGS) मोठ्या रक्कमेसाठी वन टू वन आणि व्यावसायासाठी टू बिझनेस ट्रान्सफर ची सुविधा मिळते.

युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI)

यूपीआय सेवा नॅशनल पेमेंट्स बँकांशी संपर्क साधून निधी हस्तांतरणास मदत करते. ते वापरण्यासाठी, पैसे पाठविणाऱ्या आणि पैसे घेणाऱ्या दोघांनाही यूपीआय आयडेंटीटी असणे आवश्यक आहे. प्रत्येक बँकेचे स्वत:चे यूपीआय अॅप असते.

मोबाइल वॉलेट

सध्या मोबाइल वॉलेटचा वापर लक्षणीय वाढला आहे. याद्वारे फोन बिलापासून डीटीएच रिचार्जपर्यंत आणि भाजीपाला बिलापासून कॅब बिलापर्यंत पेमेंट करता येते. मोबाइल वॉलेटमध्ये पैसे ट्रान्सफर करण्यासाठी कोणतेही शुल्क लागत नाही.

मोबाइल बँकिंग

आपण आपले बँक खाते ज्या बँकेत आहे त्या बँकेचे अॅप किंवा ब्राऊझरमधून चालवू शकता. त्याच सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ते सहजपणे ऑपरेट केले जाऊ शकते. युजर बँकेच्या इतर सर्व सेवांचा लाभ घेऊ शकतो.