Life Certificate | Pensioners ने लक्ष द्यावे! हे अधिकारी रेकॉर्ड करू शकतात तुमचे Life Certificate, सरकारने केली नियुक्ती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  केंद्र सरकारच्या Pensioner ला आता Annual Life Certificate देण्यासाठी आता जास्त धक्के खावे लागणार नाहीत. मोदी सरकारने त्यांच्यासाठी ठिकठिकाणी अधिकार्‍यांची नियुक्ती केली आहे. म्हणजे पेन्शनधारक किंवा फॅमिली पेन्शन घेणार्‍यांनी बँक, ट्रेजरी, Post Office किंवा एखाद्या दुसर्‍या सरकारी केंद्रावर जाऊन प्रमाणपत्र दिले तर ते स्वीकारले जाईल. यामुळे त्यांची पेन्शन थांबणार नाही.

अंडर सेक्रेटरी राजेश कुमार यांच्यानुसार, लाईफ सर्टिफिकेट जमा करण्यासाठी केंद्रीय कर्मचारी बँकेत जातात. यामुळे त्यांना खुप अडचणी येतात. आता सरकारने आणखी अनेक केंद्र सुरू केली आहेत, जिथे तुम्ही तुमचे सर्टिफिकेट देऊ शकता.

येथे रेकॉर्ड करा Life Certificate Pension Disbursing Banks (PDAs) म्हणजे ज्या बँकेत पेन्शन येते, तुम्ही येथील मॅनेजर किंवा दुसर्‍या कर्मचार्‍याकडे आपले जीवन प्रमाणपत्र देऊ शकता.

जर तुम्ही Life certificate Form भरून पाठवला तर तुम्हाला स्वताला बँक किंवा त्या कार्यालयात जावे लागणार नाही.
जर संबंधित अधिकार्‍याने त्या फॉर्मवर साईन केल्यास ते मान्य केले जाईल.

Jeevan Pramaan Portal च्याद्वारे सुद्धा पेन्शनर ऑनलाइन जीवन प्रमाणपत्र जमा करू शकता. https://youtu.be/nNMIkTYqTF8 या लिंकवर सर्टिफिकेट जमा करण्याची पद्धत दिली आहे.

याशिवाय India Post Payments Bank (IPPB) ने घरीच जीवन प्रमाणपत्र घेण्याची सर्व्हिस सुरू केली आहे. या कामात Postman आणि ग्रामीण डाकसेवक मदत करत आहेत.
या सर्व्हिसचा लाभ घेण्यासाठी तुम्ही Google Play store वरून Postinfo APP डाऊनलोड करू शकता. https://youtu.be/cERWM_U7g54 या लिंकवर अ‍ॅप कसे काम करेल, याची पद्धत दिली आहे.

जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी सरकार 12 सरकारी बँकांना काम देत आहे.
ज्या 100 मोठ्या शहरात घरीच ही सर्व्हिस देतील. या बँका डोअर स्टेप सर्व्हिस सुरू करतील.
पेन्शनरला Doorstep Banking (DSB) मोबाइल अ‍ॅप, https://doorstepbanks.com/ आणि https://dsb.imfast.co.in/doorstep/login किंवा Toll free Number : 18001213721, 18001037188 वरून सर्व्हिस मिळेल.

 

जास्त वेळ मिळाला

सरकारने Pensioner यावेळी Digital Life Certificate (जीवन प्रमाणपत्र) जमा करण्यासाठी जास्त वेळ देण्याची घोषणा केली आहे. सरकार ही प्रक्रिया एक महिना अगोदर सुरू करत आहे.
आता 1 ऑक्टोबरपासून Digital Life Certificate (Jeevit Pramaan Patra) जमा होतील.

1 ऑक्टोबरपासून द्या सर्टिफिकेट

1 ऑक्टोबरपासून 80 वर्ष आणि त्यावरील Pensioner Life Certificate देऊ शकतात.
त्यांना पोस्ट ऑफिसच्या Jeevan Pramaan Centre मध्ये ते जमा करावे लागेल.
किंवा ऑनलाइन सर्व्हिस सुद्धा घेऊ शकतात. दोन महिने ही प्रक्रिया सुरू राहील.

 

Web Title : savings 7th pay commission pensioners latest news central government pensioner submit annual life certificate november for pension know full details here

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Nashik Accident | दुर्देवी ! सिन्नरजवळील रस्त्यात भरधाव वाहनाच्या धडकेत पल्सरवरील दोघा मित्रांचा मृत्यु

Ajit Pawar | राज्यातील शाळा आणि कॉलेज कधी सुरु होणार? अजित पवार म्हणाले…

Numismatist | 10 कोटीमध्ये विकले गेले 1 रुपयाचे हे नाणे ! काय आहे यामध्ये विशेष, तुमच्याकडे आहे का?