निवृत्तीनंतर लागणार्‍या पैशासाठी बचत करत असाल तर ‘या’ 3 गोष्टी नक्की लक्षात ठेवा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नोकरीतुन निवृत्त झाल्यानंतर एक आरामदायक जीवन जगण्यासाठी प्रत्येकाने बचत करणे गरजेचे आहे. काही लोक बचत देखील सुरु करतात परंतु अनेकांकडून यामध्ये मोठ्या चुका होतात. म्हणून जर निवृत्तीसाठी बचत करणार असाल तर काही गोष्टींची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे.

निवृत्तीसाठी बचत सुरु करताना पुढील गोष्टींची काळजी नक्की घ्या

1) निवृत्तीची योजना वेळेवर सुरु झाली पाहिजे. जे लोक यासाठी उशीर करतात त्यांची मोठी चूक होते. जेव्हा तुम्ही याबाबतची बचत सुरु कराल त्यानंतर मोठ्या कालावधीनंतर तुम्हाला या बचतीचा योग्य फायदा मिळेल. त्यामुळे निवृत्तीचा विचार करून बचत सुरु करणे खूप महत्वाचे आहे.

2) जोखमीसाठी व्यक्तीने नेहमी तयार असावे आणि त्यानुसार गुंतवणूकीचा पर्याय निवडायला हवा. अस्थिर असलेल्या गुंतवणूकीच्या पर्यायापासून दूर रहा आणि त्यात गुंतवणूक करणे टाळा. लोक बर्‍याचदा अधिक नफ्यामुळे मोहात पडतात आणि धोकादायक गुंतवणूकीचा पर्याय निवडीकडे वळतात मात्र असे प्रकार टाळावेत. एखाद्या व्यक्तीची जोखीम घेण्याची क्षमता वय, जबाबदाऱ्या आणि कुटुंबातील सदस्यांच्या संख्येनुसार बदलते. उदाहरणार्थ, अविवाहित व्यक्ती विवाहित व्यक्तीपेक्षा जास्त जोखीम घेऊ शकते.

3) जर तुमच्याकडे मर्यादित आर्थिक पाठबळ असेल तर तुम्ही याबाबतच्या सुरक्षेबाबत देखील लक्ष दिले पाहिजे. एका आपत्कालीन फंडाचे निर्माण करा ज्यामध्ये नऊ महिने ते एका वर्षापर्यंतचे पैसे असतील. उदाहरणार्थ जर तुम्हाला अचानक एखाद्या आपत्कालीन गोष्टीला सामोरे जावे लागले किंवा नोकरी गमवावी लागली तर जमा केलेल्या फंडामधून तुम्हाला फंड निर्मिती करता येईल.

पोलीसनामाचे फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/