बँकेत ‘FD’ करणार असाल तर गमावू नका ‘ही’ संधी, मिळेल 8.5 % पर्यंत व्याज

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Fixed Deposit गुंतवणूकीची एक सुरक्षित पद्धत मानली जाते. जे गुंतवणूकदार म्यूचुअल फंडमध्ये गुंतवणूक करुन जोखीम उचलू शकत नाही त्यांच्यासाठी हा पर्याय उत्तम आहे. ज्येष्ठांसाठी तर हा पर्याय उत्तम मानला जातो. काही अशा बँक आहेत ज्या चांगले व्याजदर देतात. ज्येष्ठ नागरिकांना भारतीय स्टेट बँक (SBI), ICICI BANK, HDFC BANK, AXIS BANK सामान्य नागरिकांच्या तुलनेत 0.5 टक्के अधिक व्याज देण्यात येते.

RBI द्वारे रेपो दरात कपातीनंतर सर्वच बँका जमा रक्कमेत कपात करण्याच्या विचारात आहे. त्यामुळे FD मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांच्या कमाई कमी होत आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्यांना FD मध्ये 7 दिवसांपासून 10 वर्षापर्यंत गुंतवणूक करता येते. यात तुम्ही मॅच्युरिटीच्या आधी रक्कम काढू शकतात. यात ज्येष्ठ नागरिकांना जास्त व्याज मिळते.

IDFC First Bank –
या बँकेत आता 1 वर्षापासून ते 10 वर्षांपर्यंत FD केल्यास ज्येष्ठ नागरिकांना 4.5 टक्के ते 8.50 टक्के जमा रक्कमेवर व्याज मिळते. ही दर 21 ऑगस्ट पासून लागू होतील. 1 ते 10 वर्षांच्या FD वर बँक 8.50 टक्के व्याज देते.

DCB BANK –
या बँकेत FD वर बचत खात्यापेक्षा जास्त व्याज मिळेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी ही बँक 5.90 टक्के ते 8.50 टक्के जमा राशीवर व्याज देते. 3 वर्षांच्या FD वर बँक 8.50 टक्के व्याज देते.

AU Small Finance Bank –
मोठ्या बँकेच्या तुलनेत ही बँक बचत खात्यासह FD वर अपेक्षित जास्त व्याज देते. ज्येष्ठ नागरिकांना 15 महिन्यापासून ते दीड वर्षापर्यंतच्या FD वर 8.60 टक्के व्याज देते. तर 2 वर्ष ते 3 वर्षांच्या FD वर 8.50 टक्के व्याज देते.

Visit : policenama.com