EPF Account मधील चूका दुरूस्ती करणं झालं एकदम सोपं, जाणून घ्या ऑनलाईन प्रक्रिया
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) आपल्या सदस्यांना कर्मचारी भविष्य निर्वाह निधी खात्यात केलेल्या चुका सुधारण्यास परवानगी देत आहे. बऱ्याच वेळा कर्मचार्यांच्या ईपीएफ खात्यात नाव, जन्म तारखेसह इतर माहितीमध्ये चुका होतात. कर्मचारी ईपीएफ रेकॉर्डमधील या चुका ऑनलाईन माध्यमातून सुधारू शकतात. २०१४ मध्ये युनिव्हर्सल अकाउंट नंबर (यूएएन) आल्यानंतर ईपीएफशी संबंधित सर्व प्रक्रिया सुलभ झाल्या आहेत.
युनिव्हर्सल अकाउंट नंबर १२ अंकी युनिक कोड असतो. तो ईपीएफओ सदस्याच्या पीएफ खात्याशी जोडलेला असतो. सदस्य यूएएन द्वारे त्यांचे ईपीएफ खाते सहजपणे मॅनेज करू शकतात. ईपीएफ खात्यातील चुका सुधारण्यासाठी सदस्याचे यूएएन ऍक्टिव्ह असणे आवश्यक आहे. तसेच सदस्याकडे आधार कार्ड असणे देखील आवश्यक आहे.
पीएफ खात्यात माहिती अपडेट करण्याची प्रक्रिया दोन टप्प्यात केली जाते. एक टप्पा कर्मचार्याच्या स्तरावर आणि दुसरा टप्पा नियोक्ताच्या स्तरावर असतो. जाणून घेऊया ईपीएफ खात्याचा तपशील कसा बदलायचा…
सर्वप्रथम सदस्याला ईपीएफओच्या अधिकृत वेबसाइट epfindia.gov.in वर जावे लागेल आणि तेथे लॉग इन करावे लागेल. आता मॅनेजवर क्लिक करा आणि ‘modify basic details’ वर क्लिक करा.
आता आपला आधार क्रमांक टाकावा लागेल.
आता आपले नाव, लिंग, जन्मतारीख इ. अपडेट करू शकता. लक्षात ठेवा की ही सर्व माहिती आपल्या आधार कार्डसह जुळली पाहिजे.
आता रिक्वेस्ट सबमिट करा.
एकदा रिक्वेस्ट सबमिट झाल्यावर त्याला नियोक्ताद्वारे व्हेरिफाय करणे आवश्यक असेल. व्हेरिफिकेशनची रिक्वेस्ट ऑटोमॅटिकपणे नियोक्त्याकडे जाईल.