रिटायरमेंट प्लॅनिंग करताय ? तर ‘या’ चुका पडू शकतील महागात, जरा संभाळून

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सेवानिवृत्त (रिटायर्ड) होणारी व्यक्ती विविध योजनेच्या माध्यमातून स्वत:चे भविष्य चांगले असावे यासाठी प्लॅनिंग करत असते. पण अनेकदा नोकरीदरम्यान कार घेणे, घर घेणे किंवा कोणत्याही योजनेत एका विशेष हेतूनुसार गुंतवणूक करणे हे बहुतांश कर्मचारी करत असतात. पण काही लोक अशा काही चुका करतात त्या त्यांना नंतर महागात पडू शकतात.

रिटायर्डमेंटसाठी कोणतीही बचत नसणे
बऱ्याचदा लोक रिटायर्डमेंटवेळी कोणत्याही प्रकारची बचत करत नाहीत. पीपीएफ आणि विमा योजना निवृत्तीनंतर फायदेशीर असतील, त्यांचा असा समज असतो. त्यामुळे तुम्हाला रिटायरमेंटचे प्लॅनिंग करणे गरजेचे आहे. तुमच्या मिळकतीचा छोटा भाग जरी गुंतवणूक म्हणून ठेवला तरी त्याचा फायदा रिटायर्डमेंटवेळी होऊ शकतो.

कोणत्याही योजनेशिवाय बचत
कोणत्याही योजनेशिवाय केलेली बचत ही सर्वात मोठी चूक असते. त्यामुळे तुम्ही जेव्हा कधी बचत कराल तेव्हा कोणत्याही योजनेत पैसे बचत म्हणून ठेवावे. कारण त्याचा फायदा तुम्हाला दीर्घकाळासाठी होऊ शकतो.

काही कालावधीनंतर बचतीची सुरुवात
जेव्हा तुमचे निवृत्तीचे वय जवळ येते तेव्हा केलेली बचत हीदेखील एकप्रकारची चूक असू शकते. बचतीची सवय सुरुवातीपासूनच असायला हवी. जेव्हा तुम्ही कमावता तेव्हापासून बचतीची सुरुवात करायला हवी. चांगला परतावा (रिटर्न) मिळविण्यासाठी पहिल्या नोकरीपासूनच बचतीला सुरुवात करावी.

कर्ज टाळावे
फिक्स्ड इन्कम नसतानाही कर्ज असणे ही एक गंभीर बाब आहे. त्यामुळे अत्यंत गरजेच्याच गोष्टींसाठी कर्ज घ्यावे. तसेच कर्ज असे असावे, की तुम्ही सेवानिवृत्त होण्यापूर्वीच कर्जाची रक्कम पूर्ण भरून तुम्ही कर्जमुक्त असाल.