NPS Account Reactivation :बंद झालेलं NPS अकाऊंट पुन्हा सुरू करू शकता, जाणून घ्या प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   नॅशनल पेन्शन सिस्टम (एनपीएस) च्या सबस्क्रायबर्सना प्रत्येक वर्षी 1,000 रुपयांचे किमान योगदान द्यावे लागते, तर किमान जमा रक्कम 500 रूपये प्रति ट्रांजक्शन आहे. जर यातील मेंबर आर्थिक वर्षात 1,000 रुपयांचे किमान योगदान करत नसेल, तर त्याच्या एनपीएस खात्यासह पीआरएएन (कायमस्वरूपी सेवानिवृत्ती खाते क्रमांक) ’फ्रीज’ करण्यात येते. फ्रीज करण्यात आलेले एनपीएस खाते पुन्हा चालू करण्यासाठी युजरला काही प्रक्रियेचे पालन करावे लागते. ही प्रक्रिया कशी असते ते जाणून घेवूयात.

अशी आहे प्रक्रिया

1) खाते उघडण्यासाठी सदस्याला बँक किंवा पोस्ट ऑफिसमधून युओएस-एस10-ए फॉर्म घ्याला लागेल, ज्यामध्ये त्यांचे खाते आहे. सदस्य या लिंकवरून ऑनलाइन फॉर्म सुद्धा डाऊनलोड करू शकतात – https://npscra.nsdl.co.in/download/non-government-sector/allcitizens-of-india/forms/UoS-S10AUfreezing%20of%20PRAN.pdf

2) फॉर्म भरून ग्राहकांना पीआरएएन कार्डची एक फोटो कॉपी सोबत जोडावी लागेल.

3) मेंबरला चालू आर्थिक वर्षासाठी 500 रुपये भरावे लागतील आणि नियमित एनपीएस खात्यांसाठी फ्रीजच्या प्रत्येक वर्षासाठी 100 रुपयांचा दंड भरावा लागेल. स्वावलंबन खात्यासाठी फ्रीजच्या प्रत्येक वर्षासाठी 25 रुपये दंड असेल.

4) अर्ज जमा केल्यानंतर तो घेणारा अधिकारी तुम्ही सही केलेली एक पावती देईल. आपले खाते सक्रिय होईपर्यंत ही पावती जपून ठेवा.

5) अथॉरिटीज हे पडताळून पाहिल की, स्वीकृत खाते सक्रिय करावे किंवा नाही. जर रक्कम ऑर्डरशी जुळत असेल तर अर्ज प्रक्रिया पुढे सुरू ठेवली जाते आणि पीआरएएन सक्रिय केले जाईल.