How To Check LIC Policy Online : आपल्या LIC पॉलिसीचं ‘स्टेटस’ ऑनलाईन कसं तपासावं, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आपल्या एलआयसी पॉलिसीचे स्टेटस हे वेळोवेळी तपासले पाहिजे. एलआयसी विमाधारक त्यांच्या पॉलिसीचे स्टेटस ऑनलाईनद्वारे सहजपणे तपासू शकतात. लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया पॉलिसीधारकांना आपल्या वेबसाइटद्वारे पॉलिसीचे स्टेटस ऑनलाईन तपासण्याची सुविधा प्रदान करते. तज्ञांच्या मते, पॉलिसी खरेदी करणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच हे देखील महत्वाचे आहे. याव्यतिरिक्त, एलआयसी त्यांच्या विमा धारकांना एक मोबाइल सेवा देखील प्रदान करते, ज्याद्वारे ते त्यांच्या पॉलिसीचे किंवा पेमेन्टचे स्टेटस तपासू शकतात.

बऱ्याच वेळा असे घडते की विमाधारक त्यांच्या प्रीमियमची भरपाई करण्यात अयशस्वी ठरतात. म्हणूनच, पॉलिसीची वेळोवेळी तपासणी केली पाहिजे. पॉलिसीचे स्टेटस ऑनलाईन तपासण्यासाठी प्रथम वापरकर्त्यांना ऑनलाईन नोंदणी फॉर्म भरावा लागतो. त्यानंतर नोंदणीकृत ईमेल पत्त्यावर एक कन्फर्मेशन मेल पाठविला जातो. एलआयसीच्या वेबसाइटवर नोंदणी कशी करावी याबाबत जाणून घेऊया…

स्टेप 1. प्रथम एलआयसीची वेबसाइट ‘licindia.in‘ वर जा आणि ‘न्यू यूजर’ वर क्लिक करा.
स्टेप 2. आता आपल्याला युजर आयडी आणि पासवर्ड निवडावा लागेल आणि सर्व आवश्यक माहिती द्यावी लागेल.
स्टेप 3. ‘e-services’ वर क्लिक करा. तयार केलेल्या लॉग इन आयडीने लॉग इन करा आणि दिलेला फॉर्म भरून ई-सेवांसाठी पॉलिसीची नोंदणी करा.
स्टेप 4. आता या फॉर्मला प्रिंट करा आणि स्वाक्षरी करुन फॉर्मचा फोटो अपलोड करा.
स्टेप 5. पॅन कार्ड किंवा आधार कार्ड किंवा पासपोर्टचा फोटो अपलोड करा.
स्टेप 6. एकदा अधिकाऱ्यांनी पडताळणी केल्यावर विमाधारकास ईमेल व एसएमएसद्वारे स्वीकृतीची माहिती दिली जाईल.

असे तपासा आपले पॉलिसी स्टेटट
स्टेप 1.
एलआयसीच्या संकेतस्थळावर जा आणि ऑनलाईन सेवांमध्ये ‘Customer Portal’ वर क्लिक करा.
स्टेप 2. रजिस्टर्ड युजर पर्याय निवडा.
स्टेप 3. युजरनेम, जन्म तारीख, पासवर्ड प्रविष्ट करा आणि ‘Go’ वर क्लिक करा.
स्टेप 4. आपल्यासमोर एक नवीन पृष्ठ उघडेल. येथे आपल्याला ‘View Enrolled Policies’ वर क्लिक करावे लागेल.
स्टेप 5. सर्व नामित पॉलिसीजसह एक पृष्ठ उघडेल. यामध्ये नावनोंदणीची तारीख, प्रीमियम रक्कम आणि पॉलिसी बोनसची माहिती देखील उपलब्ध असेल. पॉलिसीधारक पॉलिसी क्रमांकावर क्लिक करून त्यांच्या पॉलिसीचे स्टेटस तपासू शकतात.

You might also like